वणी :
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणारे सर्वात युवा क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सरकारशी प्रचंड संघर्ष केला बिरसा मुंडा यांचा जन्म १ नोव्हेंबर १८७५. रोजी एका लहान शेतकऱ्याचा गरीब कुटुंबात झाला. छोटा नागपूर पठार (झारखंड) येथे राहणारा एक आदिवासी गट होता. १९०० मध्ये आदिवासींना संघटित केलेले पाहून बिरसा जी यांना ब्रिटीश सरकारने आरोपाखाली अटक केली आणि त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. आणि शेवटी ९ जून १९०० रोजी सकाळी आठच्या सुमारास इंग्रजांनी विषबाधा केल्यामुळे त्यांचे निधन झाले. अश्या महान व युवा क्रांतिकारक यांना विनम्र अभिवादन!
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या वतीने क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रभाग क्र 2 मधील तैलचित्राला हारार्पण व फुलार्पण करून अभिवादन केले.
यावेळी आ.भा.वि.प. यवतमाळ नगर T.S.V.K.सहप्रमुख व प्रांतकार्यकारीणी सदस्य इंजि चैतन्य तुरविले, वणी नगर कार्यालय मंत्री हर्षल बिडकर, सदस्य ओम मडावी, प्रज्वल मांडे, नीरज चौधरी, व परिसरातील नागरिक उपस्थित होते.