अकोला/मूर्तिजापूर(प्रतिनिधी ✍🏻 शकील खान) :-मा.आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या जांभा- कौलखेड रस्त्यावरील काटेपुर्णा नदीवरील पुलाच्या कामाची मा.आमदार हरीष मा.पिंपळे यांनी मंगळवार दिनांक 8 जुन रोजी पाहणी केली. सदर पुलाच्या बांधकामाचा एकूण खर्च 6 कोटी 75 लक्ष रुपये एवढा असून आ.हरीष मा.पिंपळे यांच्या विशेष प्रयत्नांनी मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनमधून हे काम मंजूर झाले आहे. प्रगती पथावर असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी व कामसबंधीत माहिती यावेळी आमदार साहेबांनी घेतली.
यावेळी आ.हरीष मा.पिंपळे, कार्यकारी अभियंता नाटक साहेब, उपअभियंता आपोतीकर साहेब, शाखा अभियंता के.जी.देशमुख साहेब, भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, भाजयुमो तालुकाध्यक्ष पप्पु पाटील मूळे, शासकीय कंत्राटदार बकाल साहेब, प्रदीप बोलके, निलेश हांडे यांची उपस्थिती होती.