जन शिक्षण संस्थान चंद्रपुर येथील प्रशिक्षणार्थ्यांना नवीन व्यवसाय भांडवल उभारणी करिता जिल्हा व खादी ग्रामोद्योग संघातर्फे मार्गदर्शन.
प्रतिनिधी✍🏻नागेश नेवारे
चंद्रपूर ता. ८ जुन. :- सद्यस्थितीचा संकट काळ लक्षात घेता अनेक लोक बेरोजगार झालेले आहेत बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे काहींच्या नोकर्या गेल्या तर काहींचे व्यवसाय संपूर्णपणे बंद झालेले आहेत आणि त्यांना आर्थिक चटके सोसावे लागत आहेत याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर त्यांच्या शारिरीक तेवर आणि त्यांच्या मानसिकतेवर मोठ्या प्रमाणात पडत आहे. जन शिक्षण संस्थान चंद्रपुर ll ही चंद्रपूर मध्ये असलेली एक व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था आहे. अनेकांना संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रशिक्षण मोफत दिले जाते समाजातील व्यक्तींना रोजगार व व्यवसाय करता यावा यासाठी त्यांना सक्षम करण्याचे काम प्रशिक्षण देऊन ही संस्था करत आहे.
या संस्थेमधून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना या योजने विषयी जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघ चंद्रपूर यांच्या वतीने नवीन व्यवसाय उभारणीकरिता भांडवल कशाप्रकारे उभारले जाऊ शकते त्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत आपण व्यवसाय करून कसे सक्षम होऊ शकतो व्यवसाय उभा केल्यानंतर त्याचे मार्केटिंग कसे करायचे यासंदर्भात संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून जन शिक्षण संस्थान चंद्रपुर प्रमुख मा. मोहन राऊत सर उपस्थित होते. सोबतच प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. भास्कर मेश्राम सर ( जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघ प्रमुख चंद्रपूर ) उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व आभार संस्थेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी स्वप्नील चिकटे यांनी केले. या कार्यक्रमात एकूण 30 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.