रत्नागिरी -( ✍🏻किरण घाटे- विशेष- प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र व रत्नागिरी जिल्हा खेड तालुका कमिटीच्या वतीने नुकतेच ७ वे आँनलाईन कविसंमेलन पार पडले .या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान मुंबईतील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ व प्रसिद्ध साहित्यिका कवयित्री छाया कोरेगावकर यांनी विभूषित केले हाेते तर कविसंमेलनाचे उद्घाटक म्हणून भारतीय स्टेट बँक शाखा खेड चे मुख्य व्यवस्थापक व DBA कोकण विभागीय कोषाध्यक्ष निलेशजी तांबे लाभले हाेते .या यावेळी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या आरंभी वंदनगीत प्रमोद तांबे खेड D.B.A.अध्यक्ष यांनी सादर केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र मोहिते यांनी करून कविसंमेलनाचा उद्देश स्पष्ट केला.
त्यानंतर खेड तालुक्याची महती सांगणारे स्फूर्तीदायक गीत
अँड.संतोष सावंत यांनी गाऊन वातावरण मंगलमय केले.नंतर ख-या अर्थाने कवि संमेलनाला सुरुवात झाली .पुणे येथील प्रसिध्द गझलकार व कवयित्री कविता काळे यांनी ठाव गझल सादर करून चैतन्य निर्माण केले. तर चंद्रपूर येथील कवयित्री तथा सहजं सुचलं काव्यकुंजच्या सदस्या भावना खोब्रागडे यांनी आपल्या कवितेतून त्यागमुर्ती माता रमाईचं दर्शन घडविले. पुणे येथील प्रसिद्ध साहित्यिक गझलकार ,कवी विजय वडवेराव यांनी काळजातील जीवा ही सुंदर गझल सादर करून परत एकदा वातावरणात रंग भरला . तदवतचं रत्नागिरी येथील भिमशाहिर जनार्दन मोहिते यांनी शिवरायांना अभिवादन करणारा पोवाडा सादर करून शिवरायांचा जयघोष केला.शिलवंतकुमार मडामे नागपूर, विभागीय अध्यक्षा प्रतिमा काळे पुणे, युवराज सुरळकर जळगाव, संदेश गमरे खेड ,अशोक पवार सांगली ,भिमराज तांबे,युनूसभाई शेख, दर्शन जोशी,यांच्या कविता सादरीकरणाने कविसंमेलनाची रंजकता अधिकच वाढत गेली.खेड तालुक्यातील शिवतर गावचे सुपूत्र D.B.A. ग्राफिक्सकार जितेंद मोहिते यांनी बुध्दविहार ही लक्षवेधक कविता सादर करून बुध्दविहाराचे महत्व पटवून दिले. महाराष्ट्रातील प्रतिभावंत कवी व कवयित्रिंनी विविध सादरीकरण केलेल्या रचना अनेकांना भावल्या, त्या मनात घर करून राहिल्या. या कविसंमेलना निमित्त खेड पंचायत समितीचे सदस्य व D.B.A. चे जेष्ठ मार्गदर्शक गणेशजी मोरे यांनी D.B.Aच्या कार्याचा आढावा घेऊन शुभेच्छा दिल्या,कोकण विभागीय मार्गदर्शक दिपकजी पवार कोकण विभागीय अध्यक्ष विनोदजी जाधव प्राचार्य सुरेश कुराडे व सुनिल सुरेखा या राज्य कमिटिच्या पदाधिकार्यांनी आपली मनोगत या वेळी व्यक्त केली. खेड तालुका बौध्द समाज सेवा संघ मुंबई कमिटी माजी अध्यक्ष संजय कापसे यांनी शुभकामना देवून आंबेडकरी साहित्यिक विचारमंचचे अभिनंदन केले.कविसंमेलनाच्या अध्यक्षाजेष्ठ आंबेडकरी साहित्यिका व प्रसिध्द कवयित्री छाया कोरेगावकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र खेड तालुका या कमिटिचे विशेष आभार व्यक्त केले,आंबेडकरी साहित्यिकांना योग्य दिशा देण्याचे काम हा आंबेडकरी साहित्यिक विचारमंच करीत आहे.आज साहित्यिकांनी संघटित होणे काळाची गरज आहे.साहित्यिकच वैचारिक क्रांती आणि वैचारिक परिवर्तन घडवून आणू शकतो.असे मौलिक मार्गदर्शन केले. आपल्या निवडक कवितांचे त्यांनी वाचन करून अध्यक्षीय भाषणाचा समारोप केला.
ज्यांनी आपल्या ओघवत्या भाषा शैलीत कविमनावर चार तास अधिराज्य गाजविलेल्या महाराष्ट्राच्या उत्तम लाडक्या निवेदिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्राच्या कोकण विभागीय सचिव रिया पवार(दहिसर मुंबई) यांच्या उत्तम निवेदनाने ख-या अर्थानं कविसंमेलनाची रंजकता वाढली त्या बद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. कविसंमेलनात सहभागी हाेणा-या सर्व मान्यवर मंडळीचे आभार D.B.A. खेड कमिटिचे सचिव अमोल कांबळे यांनी मानले .