तालुका प्रतिनिधी/रत्नदिप तंतरपाळे
अमरावती /चांदूर बाजार (कृष्णापुर):- महाराष्ट्र सरकारने सम्पूर्ण महाराष्ट्रात सुरु केलेल्या एम एस आर टी सी च्या खाजगिकरणा विरोधात RMBKS(राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ) ह्या ट्रेड यूनियन अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामण्डळ शाखा महाराष्ट्र राज्याच्या वतीने 300 यूनिट,250 आगार,6 विभागीय कार्यालय येथे एस.टी.च्या होत असलेल्या खाजगिकरणाच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने एसटी महा
मंडळाच्या खाजगीकरणाचा घाट घातलेला आहे.50 टक्के खाजगीकरणाचे काम पूर्ण झाले असून 50 टक्के उर्वरित आहे. यामुळे लाखो बहुजन एस टी कर्मचारीवर्ग हे बेरोजगार होतील तसेच गरिबांची व इतरांची जीवन वाहिनी असलेली ‘लालपरी’म्हणजे एसटी ही बंद झाल्यामुळे प्रवासाचे हाल होतील म्हणून खाजगीकरण होऊ नये यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघा तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आज दि.7 जून 2021रोजी मा.तहसीलदार साहेब चांदूरबाजार कार्यालय समोर काळी पट्टी बांधुन आंदोलन करून निवेदन देण्यात आले.त्याचाच भाग म्हणून आज चांदूरबाजार जिल्हा अमरावती येथे चांदूरबाजार एस टी डेपोतील व्यवस्थापिका मा.वासनिक मैडम यांना तसेच मा.चांदूरबाजार तहसीलदार साहेब यांना RMBKS चे रावसाहेब मकेश्र्वर वाहतूक निरीक्षक,राजेंद्र सोळंके,पी.ऐन. घायर वाहक व st कर्मचारी,तसेच प्रोटान चे मिलिंद आठवले,भारत मुक्ती मोर्चा तालुका अध्यक्ष सागर शिंगाडे, बामसेफ चे दामोदर खा परे ,अशोक नन्नवरे,रोशन इंगळे,नंदलाल वासनिक,गौरव भोवते यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.