ग्रामीण भागातील रुग्णाने 22 दिवस कोरोनाशी झुंज देत केली मात, पुष्पहार अर्पण करून कोरोना योद्ध्याचे गावकऱ्यांनी केले स्वागत

0
738

ग्रामीण भागातील रुग्णाने 22 दिवस कोरोनाशी झुंज देत केली मात, पुष्पहार अर्पण करून कोरोना योद्ध्याचे गावकऱ्यांनी केले स्वागत

कोरपना/प्रतिनिधी : कोडशी बु येथील कोरपना तालुक्याच्या ग्रामीण भागातील रुग्णाने तब्बल 22 दिवस कोरोना आजाराला झुंज देत या आजारातून बरा होऊन स्वगावी परतला. कोडशी बु गाव कोरोना मुक्त झाल्याबद्दल पोलीस पाटील पांडुरंग पाटील जरीले तथा कोडशी बु ग्रामवासीयांनी आनंद व्यक्त केला.
कोविड योद्धा अनिल देवराव कुळसंगे यांनी कोरोनावर 22 दिवसा नंतर मात करून स्वगावी परतले. तेव्हा गावचे पोलीस पाटील तथा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पाटील जरीले उपसरपंच बंडू पा. वासेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ कल्पना जरीले, शंकर जाधव, रवींद्र जरीले, भीमराव पुसनाके, विठ्ठल कुडमीते, नामदेव वासेकर, रामदास कुमरे, आशा वर्कर रेखाबाई कुरसंगे, सर्पमित्र संदीप सिडाम, बालू केराम, प्रशांत उपरे, गुरुदेव सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष मुरलीधर पा. जाधव, पार्वताबाई कुरसंगे, यांनी कोविड योद्धा चे पुष्प हार अर्पण करून तथा फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here