अकोला/मूर्तिजापूर( प्रतिनिधी✍🏻शकील खान ) मूर्तिजापुर :- केंद्रातिल मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व एल पी जी गैस च्या कीमती भरमसाठ वाढविल्या असून पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाला आहे ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लीटर होण्यास फार दिवस लागणार नाही तसेच स्वंयपकाचा गैस ९०० रुपये झाला आहे या महागाई मुळे लोकांचे जगने कठिण झाले आहे आधीच कोरोनाच्या जनता त्रस्त आहे त्यात महागाई चा मार सहन करावा लागत आहे व मोदी सरकारने पेट्रोल डिझेल मधून कराच्या रुपयाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे म्हणून कॉंग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे आदेशनुसार व अकोला जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष हिदायत पटेल यांचे सूचनेनुसार मूर्तिजापुर तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील तीन पेट्रोल पंप वर जाऊन पेट्रोल डिझेल व गैस दर वाडीच्या विरोधात भाजपा केंद्र सराकर च्या विरोधात नारे बाजी करून निर्दशने करून जाहिर केंद्रातिल मोदी सरकारच्या जाहिर निषेध केला या वेळी अकोला जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बंडू डाखोरे , तालुका कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब बाजड , शहर कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष रोहित सोळंके , तालुका उपाध्यक्ष डॉ विजय.वानखडे , शहर कॉंग्रेस कमिटी महासचिव सोहेल शेख , असंघटित कामगार कोंग्रेस शहर अध्यक्ष दीपक खंडारे , सेवादल तालुका अध्यक्ष सुनील वानखडे , शंकरराव साबळे , हरिदास सोळंके , गोवर्धन पाथोडे , अजहर अली नवाब , अकबर ठेकेदार , नितिन गायकवाड़ , तौसीफ खान , मो शाहबुद्दीन , अमोल तातुर्कर , आदिंची उपस्तिथि होती…