पैनगंगा प्रकल्प मस्त शेतकरी त्रस्त न्याय न मिळाल्यास ठिय्या आंदाेलन करण्यांचा सुरज ठाकरेचा इशारा !
किरण घाटे काेरपना
-चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गाडेगाव या भागात वेकोली चा पैनगंगा हा प्रकल्प आहे या प्रकल्पाकरिता गाडेगाव तथा विरुर या भागातील गावकऱ्यांच्या संपूर्ण जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या असुन हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे परंतु या प्रकल्प नजीक असलेल्या सर्वे नंबर-११९ हे शेत उत्तम बोबडे यांचे मालकीचे आहे सदरहु शेतामध्ये दरवर्षी पावसाचे अमाप पाणी साचते परंतु ते पाणी बाहेर निघून जाण्याकरिता कुठलाही मार्ग नसल्याने यामध्ये जे काही पीक बाेबडे घेण्याचा प्रयत्न करतात त्या संपूर्ण उभ्या पिकांचे नुकसान सातत्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून हाेत आहे यांस सर्वस्वि वेकोलिच्या पैनगंगा प्रकल्प हा प्रामुख्याने कारणीभूत आहे या बाबत वारंवार वेकोली प्रशासनाला पत्रव्यवहार करून देखील त्यांच्या शेतालगत असलेला मातीचा पहाडासारखा ढीगारा वेकोलि प्रशासनाने अद्याप हटविला नाही. त्रस्त झालेल्या शेतक-याने अखेर प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरज ठाकरे यांच्याकडे न्यायासाठी निवेदन सादर केले आहे सुरज ठाकरे यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेत सात दिवसांचा अल्टिमेटम वेकोली प्रशासनाला दिलेला आहे. शेतामधील असलेल्या पाण्याला निघून जाण्याकरिता मार्ग जर वेकोलि प्रशासनाने करून दिला नाही तर क्षेत्र प्रबंधक यांच्या कार्यालयामध्ये (ताडाळी या ठिकाणी )ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखिल ठाकरे यांनी एका पत्रकातुन प्रशासनाला दिला आहे .विशेष बाब म्हणजे वेकोलि प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेत येत्या सात दिवसाच्या आत बोबडे यांना या त्रासापासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे आतापर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई देखील देण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर करण्यात येणार असल्याचे आश्वासन संबंधिताकडुन मिळाले असल्याचे समजते