हिंगणघाट .तालुका प्रतिनिधी ✍️अनंता वायसे
स्थानीय हिंगणघाट तालुक्यातील वेणी येथील अंगणवाडी मध्ये शिक्षण घेणारी कुमारी संबोधी दिवाकर ठमके 5 वर्ष या मुलींनी आकाशवाणी नागपूर “शाळे बाहेरची शाळा” या कार्यक्रमात मुलाखत देऊन गावाची शोभा वाढविली. कोरोना काळामध्ये प्रथम शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून “शाळे बाहेरची शाळा” हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये हिंगणघाट तालुक्यातील सर्व गावातील मुलांनी सहभाग घेऊन ऑनलाईन पद्धतीने आपले शिक्षण घेतले. या उपक्रमाचा विद्यार्थीना मोठा फायदा होत असल्यामुळे गावातील नागरिकांनी सुद्धा प्रथम शिक्षण संस्थेच्या या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला . “शाळे बाहेरची शाळा” या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एक विद्यार्थीना आकशवाणी वर सवांद साधन्यांची संधी प्राप्त होत असते. तीच संधी वेणी येथील अंगणवाडी मध्ये शिक्षण घेणारी कुमारी संबोधी दिवाकर ठमके 5 वर्ष हिला मिळाली त्यामुळे गावातील सरपंच अमोल दुरतकर, अंगणवाडी सेविका वैजनतीमाला कुमरे, प्रथम शिक्षण संस्थेच्या जिल्हा समन्वयक सौ. श्वेता धोटे, तालुका समन्वयक अमोल इटेकर आणि तिचे आई वडील गावातील सर्व नागरिकांनी मोठया प्रमाणात स्वागत करून अभिनंदन केले.