‘वृक्षसंवर्धन ही सामूहिक जबाबदारी’ – इवनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुप कडून नर्सरी मार्गाच्या दूतर्फा वृक्षारोपण १५०० वृक्षलागवडिचा अभिनव संकल्प

0
753

‘वृक्षसंवर्धन ही सामूहिक जबाबदारी’ – इवनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुप कडून नर्सरी मार्गाच्या दूतर्फा वृक्षारोपण

१५०० वृक्षलागवडिचा अभिनव संकल्प

राजुरा/प्रतिनिधी (६ जून): राजुरा शहरातील इवनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुप द्वारे शहरालगत असलेल्या वनविभागाच्या नर्सरी मार्गाची स्वच्छता करण्यात आली. या मार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली. या मार्गावरील काचेच्या व पाण्याचा रिकाम्या बॉटल्स, वेफर्सचे प्लास्टिक आवरण व अन्य पदार्थ जमा करण्यात आले. या मार्गावर पहाटे आणि सायंकाळी मैदानी खेळाचा सराव करणारे मुलं, व्यायामासाठी येणारे जेष्ठ नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन इवनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुपच्या सदस्यांनी ही स्वच्छता मोहीम राबवीत वृक्षारोपन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण धोटे नगराध्यक्ष नगर परिषद राजुरा तर उद्घाटक म्हणून सुनील देशपांडे उपनगराध्यक्ष होते. प्रमुख अतिथि म्हणून नगरसेवक राजेंद्र डोहे, गजानन भटारकर, भाऊजी कन्नाके, आरपीआय (आ.) जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे, नेफडोचे नागपूर विभाग सचिव बादल बेले, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोष देरकर, घनश्याम हिंगाने, सुधाकर चांदेकर, राजू धोटे, सामाजिक वणिकरण विभागाचे वनपाल विलास कुंदोजवार, गिरडकर, गजानन सावनकर, प्रदीप कडवाने, आसिफ सय्यद, जेष्ठ नागरिक बाणकर आदींची उपस्थिती होती.
इवनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येत शुक्रवार रोजी सांयकाळी या मार्गावरील स्वच्छता केली. तर आज जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनाचे संयुक्त औचित्य साधून ६ जून ला भव्य वृक्षारोपन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बंडु बोढे यांनी मानले तर प्रास्तावीक आकाश वाटेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता चेतन सातपुते, सतिश बानकर, जगदीश साठोने, आकाश वाटेवर, भुपेंद्र साठोने, बबलू चव्हाण, प्रज्वल उराडे, राहुल पिदूरकर, विकी भोज, दिनेश ठाकरे, पवन पिंपळशेंडे, शुभम सोयाम, पचारे, अक्षय गावंडे, संदीप मडावी, दिनेश कवलकर, उमेश मंगरूळकर, गजानन बेले, लुकेश बुटले, विजय काळे, सुधीर लोणारे, नागेश जाधव, विशाल मांढरे आदी युवकांनी प्रामुख्याने सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here