Home चंद्रपूर वर्धा नदीच्या त्रिवेणी संगमावर तीन जण बुडाले, बोटीच्या सह्याने शोध मोहीम सुरु

वर्धा नदीच्या त्रिवेणी संगमावर तीन जण बुडाले, बोटीच्या सह्याने शोध मोहीम सुरु

0
24

वर्धा नदीच्या त्रिवेणी संगमावर तीन जण बुडाले, बोटीच्या सह्याने शोध मोहीम सुरु

घुग्घूस :-येथून आठ किमी अंतरावर असलेल्या वर्धा नदीच्या धानोरा त्रिवेणी संगमावर तीन जण बुडाल्या ची घटना घडली असून त्यांचा शोध पोलीस बोटीच्या सह्याने घेत आहे.पाण्यात बुडाल्याची नावे राजू हरिश्चन्द्र कोडापे वय 40 वर्ष, त्याची मुलगी अर्पिता राजू कोडापे वय (12)वर्ष दोन्ही रा. खामोना ता. राजुरा व राजू कोडापे यांची भाची प्रियंका शामराव मडावी वय (14)वर्ष रा. धानोरा ता. चंद्रपूर अशी आहे.

माहितीनुसार राजुरा तालुक्यातील खामोना या गावातील रहिवाशी राजू हरिश्चन्द्र कोडापे वय (40)वर्ष व त्याची मुलगी कु.अर्पिता राजू कोडापे वय (12) वर्ष हिला घेऊन धानोरा येथे बहिणीच्या घरी आला होता.आज दिनांक 28 एप्रिल ला सकाळी 10.30 ते 11.00 वाजता दरम्यान वर्धा नदी काठी कपडे धुण्यासाठी गेले असताना राजू कोडापे हा स्नान करण्यासाठी पाण्यात उतरला त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला व गटांगळ्या खाऊ लागला त्याने स्वतःला वाचविण्याचा प्रयन्त करीत असताना त्यावेळी त्याची मुलगी अर्पिता कोडापे व त्याची भाची प्रियंका मडावी यांनी नदीत उडी मारून राजू याला वाचविण्याचा प्रयन्त केला मात्र ते तिघेही खोल पाण्यात बुडाले.

या घटनेची माहिती गावातील नागरिकांना होताच नदीकडे लोकांनी धाव घेतली व याची माहिती घुग्घूस पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बोटीच्या सह्याने शोध मोहीम सुरु केली वृतलिहीत पर्यत शोध मोहीम सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!