Home चंद्रपूर कोळसा खाण कंत्राटी स्थानिक कामगार संघर्ष मोर्चा आमरण उपोषण सुरूच

कोळसा खाण कंत्राटी स्थानिक कामगार संघर्ष मोर्चा आमरण उपोषण सुरूच

0
260

कोळसा खाण कंत्राटी स्थानिक कामगार संघर्ष मोर्चा आमरण उपोषण सुरूच

दि.२० एप्रिल रोजी उपोषण सुरू करण्यात आले. प्रमुख मागणी याप्रमाणे आहे की,वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत माती आणि कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थानिक लोकांना डावलून बाहेरील कामगारांकडून ठेकेदार कंपन्यांमार्फत कमी वेतनात जास्त काम करून घेत ले जात आहे – हा अन्याय उघड आहे! Principal Employer म्हणून WCL कडून हस्तक्षेप अपेक्षित आहे, तरीही कारवाईचा अभाव का? उत्तर द्या!
जी.आर.एन. कंपनीची मनमानी चालणार नाही! चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर घुग्घुस आहे, आणि घुग्घुसमधील बेरोजगारांना नोकरी देण्यास कंपनी अधिकाऱ्यांचा स्पष्ट नकार. एकीकडे प्रदूषणामुळे जनता त्रस्त आहे, तर दुसरीकडे रोजगारापासून वंचित! वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड शुद्धीवर या – रोजगार द्या, रोजगार द्या!
स्थानिक लोकांचे जीवन उद्ध्वस्त, हातांना काम नाही आणि पोटासाठी संघर्ष! ही परिस्थिती आमच्यावरच का? Western Coalfields Limited आता मौन सोडा, जबाबदारी स्वीकारा आणि स्थानिकांना तात्काळ रोजगार द्या!
माती आणि कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम उपलब्ध असूनही स्थानिक लोकांना बाहेर ठेवणे असह्य आहे! हा अन्याय तात्काळ बंद करा! Western Coalfields Limited अनुभवी स्थानिक लोकांना कामावर घ्या आणि स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घ्या!
अमृत महोत्सवाच्या काळातही कामगारांना हक्काची वेतन पर्ची नाही – हाच का विकास? Western Coalfields Limited च्या निष्काळजी कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह! Principal Employer म्हणून उत्तर द्या!
स्थानिक लोकांना डावलून बाहेरील कामगारांना धोकादायक कामावर लावले जात आहे! 2020 ते 2026 दरम्यान वाढते अपघात आणि दुर्घटनाजन्य मृत्यू – ही गंभीर निष्काळजीपणा तात्काळ थांबवा! जबाबदारांवर कठोर कारवाई करा!
Western Coalfields Limited अंतर्गत माती आणि कोळसा उत्खनन ठेक्यांमध्ये स्थानिक लोकांना डावलले जाते, कारण स्थानिकांना कामावर घेतल्यास वेतन, वेतन पर्ची आणि सर्व कायदेशीर सुविधा देणे बंधनकारक होते. Western Coalfields Limited Principal Employer असूनही ही स्थिती का? कामगार हक्कांवरील हा आघात तात्काळ सुधारावा!
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत माती व कोळसा उत्खनन करणाऱ्या ठेका कंपन्यांमधील ही कामगारविरोधी साजिश तात्काळ बंद केली नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. ठेका संपल्यानंतर जुन्या कामगारांना हटवून नवीन लोकांची भरती करून त्यांच्या हक्कांवर डाका टाकला जात आहे. हा अन्याय आता अजिबात सहन केला जाणार नाही.
कोळसा वाहतुकीमुळे रस्ते उद्ध्वस्त, अपघातात मरतो स्थानिक, प्रदूषणामुळे जगणे कठीण आणि रोजगार बाहेरील लोकांना! वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, हा अन्याय तात्काळ बंद करा; स्थानिकांना त्वरित रोजगार द्या!
कामगार/कर्मचारी जितके दिवस काम करतात, त्यानुसार जी रजा जमा होते तिला EL (Earned Leave) म्हणतात. हर्षा कंपनीने मागील तीन वर्षांपासून ही सुविधा कामगारांना दिलेली नाही. हर्षा कंपनीतील कामगारांच्या हक्कासाठी आवाज उठवणे महागात पडले! जय विदर्भ कामगार संघटनेचे महासचिव प्रदीप विलास टिकले आणि सहसचिव सुरेंद्र लक्ष्मण गावतुरे, जे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (Principal Employer) अंतर्गत कार्यरत होते, त्यांना ठोस कारणांशिवाय एक वर्षापूर्वी नोकरीवरून काढण्यात आले – हा उघड अन्याय आहे!
श्री. बुद्धा कंपनीमध्ये शेकडो कामगारांना नोंदीबाहेर ठेवून त्यांचे महिन्यांचे वेतन दाबणे आणि कंपनीचे पळून जाणे हे सरळ शोषण आहे; जर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या नोंदीत न दाखवलेल्या कामगारांसोबत काही अपघात झाला असता तर जबाबदार कोण असता, याबाबत स्पष्ट करत संबंधित कंपनी आणि वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडला जबाबदार धरले पाहिजे.

 

मागील चार दिवसांपासून मी अन्नाचा कणही घेतलेला नाही, पाणीही घेतलेला नाही. हे आमरण उपोषण मी अत्यंत खंबीरपणे, जिद्दीने आणि आक्रमक भूमिकेतून आमरण उपोषण स्वीकारले. दिनांक २३/०४/२०२६ रोजी ०२:२३ वाजता माझी प्रकृती खालावल्यामुळे मला प्रशासनाकडून ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. आज दिनांक २४/०४/२०२६ संध्याकाळी ०६:०० वाजता मी पुन्हा उपोषण स्थळी दाखल झालो आहे. मात्र प्रशासन आणि संबंधित वेस्टन कोल फील्ड लिमिटेड हे लक्षात ठेवावे हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आहे.मी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही.जोपर्यंत वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड अंतर्गत माती व कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपन्यांमध्ये प्राधान्य मिळत नाही आणि आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरू राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!