Home गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रात गोंड पेंटिंग कार्यशाळा संपन्न

गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रात गोंड पेंटिंग कार्यशाळा संपन्न

0
34

गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रात गोंड पेंटिंग कार्यशाळा संपन्न

गोंड पेंटिंग कार्यशाळेमुळे पारंपरिक कलेला नवी दिशा

 

गडचिरोली, सुखसागर झाडे :-गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (STRC) तर्फे नुकतीच ५ दिवसीय गोंड पेंटिंग कार्यशाळा पार पडली. गोंड चित्रकला ही विदर्भ व गोंडवाना परिसरातील एक महत्त्वाची पारंपरिक लोककला असून, तिचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्टे म्हणजे स्थानिक समुदायांना गोंड चित्रकलेसाठी प्रोत्साहित करणे, लुप्त होत चाललेल्या या वैशिष्ट्यपूर्ण कलेचे जतन व प्रसार करणे, तसेच या कलेच्या माध्यमातून नवउद्योजक तयार करणे ही होती. कार्यशाळेत शालेय विद्यार्थ्यापासून ते वयस्क वयोगटातील विविध पार्श्वभूमीतील सहभागी – विद्यार्थी, उद्योजक, गृहिणी तसेच निवृत्त अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
राष्ट्रीय स्तरावर प्रख्यात असलेले गोंड चित्रकार सुनील श्याम यांनी प्रशिक्षक म्हणून कार्यशाळेत मार्गदर्शन केले. त्यांनी गोंड कलेचा इतिहास, तिची वैशिष्ट्ये, सूक्ष्म रेखाटन तंत्र, रंगसंगती आणि डिझाइन यांचे सखोल प्रशिक्षण दिले. प्रत्यक्ष सरावाच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतःची चित्रे साकारत कलेचे बारकावे आत्मसात केले.
कार्यशाळेच्या समारोप सोहळ्यास गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ.प्रशांत बोकरे यांनी चित्रकार सुनील श्याम, यांना बांबू ने तयार केलेले स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख, विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ स्वप्नील गिरडे गोंडवाना विद्यापीठ यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले. कार्यशाळेदरम्यान प्रशिक्षणार्थी यांनी आपले अनुभव व्यक्त करत अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
या उपक्रमामुळे स्थानिक कला परंपरेला चालना मिळून भविष्यात गोंड पेंटिंग क्षेत्रात नवीन संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राच्या माध्यमातून पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक कौशल्यांचा संगम साधत सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!