Home गडचिरोली भूमिपुत्रांना त्यांचा हक्क आणि रोजगार मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील...

भूमिपुत्रांना त्यांचा हक्क आणि रोजगार मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील – आमदार डॉ. मिलिंद नरोटे

0
108

भूमिपुत्रांना त्यांचा हक्क आणि रोजगार मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील – आमदार डॉ. मिलिंद नरोटे

चामोर्शी :सुखसागर झाडे :-आज पंचायत समिती चामोर्शी येथे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी (SDM) संपत खलाटे, तहसीलदार प्रशांत घोरुडे, नायब तहसीलदार फुलझेले आणि कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. १९९१ पासून सुरू झालेली ही आष्टी पेपर मिल २०१६ पासून बंद असल्याने परिसरातील जवळपास काही कामगारांचा रोजगार हिरावला गेला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी दिल्या, आज त्यांच्यासमोर रोजगाराचा आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर आपली ठाम मागणी मांडली आहे की, जर कंपनीला उद्योग चालवणे शक्य नसेल, तर मूळ करारानुसार त्यांच्या जमिनी त्यांना परत करण्यात याव्यात.
या जमिनी परत मिळवण्यासाठी शेतकरी करारातील अटींनुसार ठराविक रक्कम भरण्यासही तयार आहेत. या मागणीची दखल घेत, आमदार महेंद्र नरोटे यांनी कंपनी व्यवस्थापनाला येत्या ७ दिवसांत सर्व संबंधित दस्तावेज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणावर अंतिम तोडगा काढण्यासाठी २३ एप्रिल २०२६ रोजी चामोर्शी येथे पुन्हा आढावा बैठक बोलावली आहे. जोपर्यंत भूमिपुत्रांना त्यांचा हक्क आणि रोजगार मिळत नाही, तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील.
यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, तालुकाध्यक्षा रोशनीताई वरगंटे, मनोहरजी बामणकर तसेच इल्लूर ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!