Home गडचिरोली आईच्या जिद्दीने घडवला यशाचा मार्ग; प्राणिकेत मडावीची पोलीस दलात निवड

आईच्या जिद्दीने घडवला यशाचा मार्ग; प्राणिकेत मडावीची पोलीस दलात निवड

0
93

आईच्या जिद्दीने घडवला यशाचा मार्ग; प्राणिकेत मडावीची पोलीस दलात निवड

बिकट परस्थिती वर मात करीत प्रणयने रचला इतिहास

 

गडचिरोली, सुखसागर झाडे
“स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” या युक्ती चा प्रत्यय अतिशय अठरा कोटी दारिद्र्य बालपनापासून उपभोगत तारुण्याकडे पदार्पण केलेल्या प्रणय नें खडतर जीवनाचा प्रवास केला.
वडील अतिशय व्यसनाच्या आहारी गेलेला काही दिवसा अगोदर वडिलांची छत्रछाया परमेश्वरानी हिरावली, आई काबाड कष्ट उपसत लहाण्याचे मोठे केले त्या बाबीची जान मनाशी बाळगून, जीवनात यश संपादन करण्याची कास धरून अथक परिश्रम, जिद्द, चिकाटीच्या भरोशावर कोनसरी (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) येथील प्राणिकेत ऋषी मडावी या युवकाची गडचिरोली पोलीस दलात निवड झाली असून, त्यांच्या या यशामागे आईची जिद्द, अथक परिश्रम आणि कष्ट यांचा मोठा वाटा आहे.
प्राणिकेत लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. घरातील जबाबदारी आईवर येऊन पडली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आईने हार न मानता मुलाला शिक्षण देत त्याला उभं करण्याचा निर्धार केला. आर्थिक अडचणी, सामाजिक आव्हाने यांचा सामना करत आईने प्राणिकेतला सतत प्रोत्साहन दिले.
प्राणिकेतनेही आईच्या कष्टांची जाणीव ठेवत शिक्षणासोबतच पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली. नियमित सराव, शारीरिक प्रशिक्षण आणि अभ्यास यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.
त्यांच्या या यशामुळे कोनसरी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. प्राणिकेत मडावी हे गावातील इतर तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत.
“आईच्या कष्टांचे चीज करायचे होते, त्यामुळे हे यश मिळवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले,” अशी भावना प्राणिकेत यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!