डिजे मुक्त करून समता पर्व एक पाऊल सामाजिक सलोख्याकडे
विरुरात फुले-आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव
अविनाश रामटेके
विरूर (स्टे.) येथे आगामी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चे औचित्य साधून नवयुवक बौद्ध समाज मंडळ व पंचशील महिला मंडळ विरूर स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ ते १६ एप्रिल २०२६ दरम्यान “फुले-आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाची विशेष बाब म्हणजे “डिजे मुक्त उत्सव” ही संकल्पना राबवण्यात येत असून, ध्वनीप्रदूषण टाळून समाजात शांतता, बंधुता आणि सामाजिक सलोखा वाढवण्याचा संदेश दिला जात आहे.
महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित हा महोत्सव समाजप्रबोधन, शिक्षण आणि सांस्कृतिक जाणीव वाढवण्याचे कार्य करीत आहे.
या कार्यक्रमासाठी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य मा . प्रा. शंभरकर सर , प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या मा. डा. अभिलाषाताई गावतुरे मॅडम , गोंडवाना विद्यापीठाचे प्राध्यापक व JNU विध्यार्थी मा. सुरडकर सर व परीसरातील प्रसिद्ध मार्गदर्शक मा. बळीराज निकोडेजी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे .
या कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच माता रमाई बोलते एकपात्री नाट्य सादरकर्त्या गायत्रीताई रामटेके यांचे सादरीकरण यांचा समावेश आहे. विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध गायक मा. प्रकाशनाथ पाटणकर यांचा प्रबिधनात्मक संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवाचा मुख्य उद्देश समाजात एकता, समता आणि बंधुता वाढवणे हा असून, “डिजे मुक्त” उपक्रमातून शांततामय आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्थानिक नागरिक, युवक आणि महिलांचा मोठा सहभाग या कार्यक्रमाला लाभत असून, हा उपक्रम सामाजिक सलोखा आणि जनजागृतीसाठी एक आदर्श ठरत आहे.








