Home गडचिरोली कु. स्मिता गेडाम ला एकलव्य परीक्षेत मिळाले घवघवीत यश

कु. स्मिता गेडाम ला एकलव्य परीक्षेत मिळाले घवघवीत यश

0
75

कु. स्मिता गेडाम ला एकलव्य परीक्षेत मिळाले घवघवीत यश

एकलव्य निवासी शाळा गडचिरोली येथे निवड सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव

 

चामोर्शी, सुखसागर झाडे :-जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वेलतूर तुकूम येथील विद्यार्थिनी कु. स्मिता फकिरा गेडाम हिने उज्ज्वल यश संपादन करत पालकांच्या तथा शाळेच्या नावलौकिकात मानाची भर घातली आहे.
जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5 वी मधील विद्यार्थीनी कु. स्मिता फकिरा गेडाम या विध्यार्थिनीची “एकलव्य विद्यालय, गडचिरोली” येथे निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. तिने अभ्यासाप्रति नियोजन व मार्गदर्शक शिक्षकांचा सल्ला या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करण्यास मोलाचे ठरले.
या परीक्षेत स्मिताने यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे. या यशामागे तिची अभ्यासूवृत्ती, जिद्द व मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे.
या प्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सातपुते सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना माजी प्र.मुख्याध्यापक उंदीरवाडे सर , सहाय्यक शिक्षक भुरसे सर , दुर्गे सर तसेच सर्व शिक्षक वृंद,गावकरी मंडळी यांनी विद्यार्थ्यांनीचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!