Home चंद्रपूर राजुरा विधानसभा मतदारसंघातील नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी २ कोटी ४२ लक्ष रुपयांचा निधी...

राजुरा विधानसभा मतदारसंघातील नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी २ कोटी ४२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

0
55

राजुरा विधानसभा मतदारसंघातील नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी २ कोटी ४२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश

 

राजुरा, दि. ०५ :- राजुरा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावे ही तेलंगणा सीमेला लागून असून नक्षलग्रस्त क्षेत्रात मोडतात. या गावांचा कायापालट करण्यासाठी राज्य शासनाकडून २ कोटी ४२ लक्ष रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार देवराव भोंगळे यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, यामुळे नक्षलग्रस्त भागात येणाऱ्या गावांमधील विकासकामांना मोठी गती मिळणार आहे.

राजुरा मतदारसंघातील राजुरा,जिवती, कोरपना आणि गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावे ही डोंगराळ आणि नक्षलग्रस्त भागात वसलेली आहेत. आमदार देवराव भोंगळे यांनी निवडून आल्यापासून या भागातील पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष केंद्रित केले होते. नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये विकासकामे होऊन रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण होणे आवश्यक होते. मंजूर झालेल्या २ कोटी ४२ लक्ष रुपयांच्या निधीतून विधानसभेतील विविध गाव-गुड्यांमधील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, नाली, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सुविधांचे बळकटीकरण केले जाणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे आता या निधीतून मार्गी लागणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!