Home चंद्रपूर अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांच्या अथांग कामटकरची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांच्या अथांग कामटकरची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

0
63

अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांच्या अथांग कामटकरची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

लहान वयातच असामान्य बुद्धिमत्तेची झेप; चंद्रपूरच्या बालकाचा मानाचा विक्रम

कोरपना प्रतिनिधी
चंद्रपूर : चंद्रपूर येथील अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांच्या अथांग सोहन कामटकर या चिमुकल्याने आपल्या विलक्षण स्मरणशक्ती आणि आकलन क्षमतेच्या जोरावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये स्थान मिळवून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला ‘IBR Achiever’ हा किताब प्रदान करण्यात आला आहे.

४ ऑगस्ट २०२४ रोजी जन्मलेल्या अथांगने अतिशय कमी वयात विविध शैक्षणिक व बौद्धिक गोष्टी अचूकपणे ओळखून दाखवत हा मानाचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला. त्याने २४ प्राणी, १२ पक्षी, शरीराचे ११ अवयव, १० रंग, १३ फुले, ४ आकार, २० फळे आणि २० भाज्या अचूक ओळखून बोलून दाखवल्या. तसेच इंग्रजी व मराठी भाषेत १ ते १० पर्यंतची संख्या, इंग्रजी वर्णमालेतील २६ अक्षरे, आठवड्याचे सातही दिवस, दोन बालगीते आणि संगीतातील सात स्वर आत्मविश्वासाने सादर केले.

या सर्व कौशल्यांची पडताळणी झाल्यानंतर ८ मे २०२६ रोजी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने अथांगच्या या उल्लेखनीय कामगिरीची अधिकृत नोंद घेत त्याला ‘IBR Achiever’ म्हणून गौरविले.
अथांगच्या या यशामुळे त्याचे पालक, कुटुंबीय आणि चंद्रपूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एवढ्या लहान वयात मिळविलेल्या या यशामुळे अथांग भविष्यातही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.अथांगाच्या यशासाठी त्याचे वडील सोहन कामटकर आणि आई दिक्षा कामटकर,आजोबा अशोक कामटकर यांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!