Home चंद्रपूर छत्रपती शिवाजी महाराज चौकात होमगार्डची ड्युटी; नागरिकांमध्ये संभ्रम

छत्रपती शिवाजी महाराज चौकात होमगार्डची ड्युटी; नागरिकांमध्ये संभ्रम

0
61

छत्रपती शिवाजी महाराज चौकात होमगार्डची ड्युटी; नागरिकांमध्ये संभ्रम
घुग्घूस : शहरातील चंद्रपूर-वणी महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक (बसस्थानक चौक) येथे वाहतूक नियंत्रणासाठी होमगार्डची नियुक्ती करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या या चौकात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी किमान दोन पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. चंद्रपूर-वणी मार्गावरील हा महत्त्वाचा चौक असल्याने येथे नियमितपणे वाहतूक पोलीस तैनात असणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
काही नागरिकांनी असा आरोप केला आहे की, वाहतूक पोलीस आवश्यक त्या चौकांवर न थांबता इतर ठिकाणी अधिक वेळ घालवत असल्याने प्रमुख चौकांवरील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियुक्त करून वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता कमी करण्याची मागणी पुढे येत आहे.
याबाबत संबंधित पोलीस व वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वाहतूक पोलिसांबाबत करण्यात आलेले आरोप हे नागरिकांच्या प्रतिक्रिया व आरोप आहेत. संबंधित विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!