Home चंद्रपूर घुग्घुस शहरात बरेच दिवसांपासून पाणीटंचाई…

घुग्घुस शहरात बरेच दिवसांपासून पाणीटंचाई…

0
25

घुग्घुस शहरात बरेच दिवसांपासून पाणीटंचाई…

राजकारण शिगेला पोहोचले, नौटंकी शहरात चांगलीच गाजली

घुग्घुसः शहरातील अनेक प्रभागात पाणीटंचाई पाहता नागरिक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रमुख प्रभागात पाण्याची समस्या आहे. महिला, वृद्ध, लहान मुले पाण्यासाठी वणवण भटकत आहेत मात्र आजतागायत संबंधित विभागाने पाण्याचा प्रश्न सोडवला नाही का! शहरात पाणीटंचाई होण्याचे अनेक कारणं आहेत, जसे की वाढती लोकसंख्या, कमी पाऊस, आणि पाण्याचा गैरवापर. या समस्येवर उपाय म्हणून पाण्याचा योग्य वापर करणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, आणि पाण्याचे साठवण व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तलाव, बंधारे आणि जलसाठवण तलावांची निर्मिती करणे आवश्यक आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

“पाणीटंचाई आणि नगरसेवक जोमात” ही स्थिती सध्या महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

एकूणच, एप्रिल महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून शहरांमध्ये नगरसेवक रस्त्यावर उतरून प्रशासनाला कामे न विचारता पोस्टर्स स्टंट करणे,थोर महापुरुषाचे फोटो लावणे न काम झाल्यावर ना काढणे धुळ बसत राहणे मोठे,मोठे गोष्टी करून प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी मंत्री बोलवने आणि भर उन्हात घरोघरी जावुन नागरिकांना जमा करून गर्दी करणे हेच नगरसेवकाचे कामे राहिले, जनता, जनार्दन केव्हा जागृत होणार फक्त राजकारण करित नगरसेवक जोमात आहे, “अपना काम बनता भाड मै जाये जनता” असे फक्त चाय टपरीवरच चर्चा होत राहणार का! या एप्रिल महिना संपन्न होत आला आहे पाणीटंचाई कमी होणार का आता पहिल्यांदाच नगरसेवक बनले पण ऐकमेकाला टोमणे मारत राहणार का मिळुन सर्व नगरसेवक शहराला चांगल्या दिशेने नेणाफ का अशी चर्चा चांगलीच पसरत असून नवनियुक्त नगरसेवक लक्ष वेधून निर्णय घेवुन कामे करणार का!

शहरात राजकारण शिगेला पोहोचले आहे. त्यांची नौटंकी शहरात चांगलीच गाजत असून, आता नागरिक त्रस्त झाले आहेत. घुग्घुस येथील बरेच प्रभागात गेल्या बरेच दिवसांपासून पाणीटंचाई आहे. घरांमध्ये पाणीटंचाई का, बोअरिंग, विहिरीकडे नागरिकांची धावपळ सुरु आहे. दिवसेंदिवस तपनओस पडत आहे, आणि मुख्य पाणी जीवनस्तर असल्यास पाणीटंचाई भागविण्यासाठी परिसरात टँकरद्वारे पुरेशा प्रमाणात नळ पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकात वारंवार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!