Home चंद्रपूर गुरुकुल महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताहाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन

गुरुकुल महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताहाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन

0
46

गुरुकुल महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताहाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन

 

नांदा फाटा :- गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदा येथे दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाच्या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ आणि संस्थेचे सचिव डॉ. अनिल मुसळे यांनी भूषवले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उद्देशिकेचे वाचन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे सचिव डॉ. अनिल मुसळे यांनी आपले मत मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाबद्दल मार्गदर्शन केले. संविधान तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम विविध देशातील संविधानांचा अभ्यास केला आणि नंतरच भारताचे संविधान लिहिले. संविधानाने जनसामान्यांना जीवन जगण्याची कला शिकवली आणि मूलभूत अधिकारदेखील दिले. एवढेच नव्हे तर सामान्य माणसांना कायद्याने संरक्षण सुद्धा दिले. त्यांनी केलेल्या या महान कार्याचा विसर पडू नये, या उद्देशाने शासनाने सर्व शासकीय विभागांना 8 एप्रिल 2026 ते 14 एप्रिल 2026 हा सप्ताह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह म्हणून राबवण्याचे निर्देश दिले आहे, असे मत संस्थेचे सचिव डॉ. अनिल मुसळे यांनी मांडले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक यांनी केले आणि आभार प्रदर्शन शारीरिक व क्रीडा विभागाचे प्रा. आशिष पैनकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!