Home चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाकरीता राजुरेड्डी यांचे नामांकन दाखल

काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाकरीता राजुरेड्डी यांचे नामांकन दाखल

0
47

काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाकरीता राजुरेड्डी यांचे नामांकन दाखल

सुजन संघटन अभियानाला चंद्रपूरात सुरुवात

 

चंद्रपूर : जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाकरीता सुजन संघटन अभियाना अंतर्गत प्रक्रियेला सुरुवात झाली असून चंद्रपूर येथील एन. डी. हॉटेल येथे ए. आय. सि. सीने पाठविलेले पक्ष निरीक्षक श्री संतोष कोलकोंडा व अभय छाजेड यांच्या वतीने स्थानिक निरीक्षक विधानसभा व तालुकानिहाय कार्यकर्त्यांशी थेट संपर्क करून पक्षा करीता नवीन जिल्हाध्यक्ष पदाची निवडी करीता चाचपाणी करण्यात आली.

याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष तसेच तालुकास्तरीय ब्लॉक अध्यक्ष निवडी करीता इच्छूकांचे नामांकन अर्ज घेण्यात आले याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील वॉटर म्हणून प्रसिद्ध व काँग्रेस पक्षाचे फायर ब्रँड नेतृत्व व युवकांच्या गळ्यातील ताईत घुग्घूस शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच घुग्घूस नगरपरिषदेचे उपाध्यक्ष तसेच पानी पुरवठा सभापती राजुरेड्डी यांनी देखील जिल्हाध्यक्ष पदाकरीता नामांकन दाखल केले.

याप्रसंगी नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के, काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, स्वच्छता सभापती नूरूल सिद्दीकी,बालकिशन कुळसंगे, शहजाद शेख, कुमार रुद्रारप, कपील गोगला, संजय कोवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!