Home चंद्रपूर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व.मा. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल सर्वपक्षीय शोक सभा;...

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व.मा. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल सर्वपक्षीय शोक सभा; आठवणींना उजाळा

0
142

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व.मा. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल सर्वपक्षीय शोक सभा; आठवणींना उजाळा

राजुरा : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे नुकतेच बारामती जवळ विमान अपघातात निधन झाले.या दुःखात राजुरा येथील संविधान चौकात सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन केले गेले. या सभेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व राजुरा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शोक सभेत राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वगुणांना, विकासाभिमुख निर्णयांना व राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देत आठवणी सांगितल्या. यावेळी नगराध्यक्ष यांनी आपले जुने अनुभव शेअर करत मा.अजितदादा पवार यांच्यासोबत राजुरा शहराच्या विकासासाठी अनेकवेळा झालेल्या चर्चांची आठवण सांगितली.

सभेचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष रकीब शेख यांनी तर संचालन राष्ट्रवादीचे युवा नेते आदित्य भाके यांनी केले. यावेळी सभेत उपस्थित मान्यवरांनी स्व.मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वगुणांना, विकासाभिमुख निर्णयांना व राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देत आठवणी सांगितल्या.

या आठवणींनी उपस्थितांचे हृदय स्पर्शले आणि मा.अजितदादा पवार यांच्या प्रामाणिक नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जहीर खान,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष देरकर,आझाद फाउंडेशन चे आसिफ सय्यद राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुजित कावळे,तसेच भाजप शहराध्यक्ष सुरेश रागीट,सचिन भोयर, नगरसेवक भूपेश मेश्राम, रत्नाकर पायपरे,संजय रामटेके,महिला माजी नगरसेविका पुष्पा कोडापे,गजाला शेख,अंकुश भोंगळे,सिद्धार्थ वाघमारे,रोहित बत्ताशंकर, खुशाल सूर्यवंशी तसेच अनेक पक्षातील कार्यकर्ते व सामाजिक संघटनेतील कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!