घुग्घूस नगरपरिषद तर्फे उप – मुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित
घुग्घूस : महाराष्ट्राचे उप – मुख्यमंत्री अजित दादा पवार हे आज सकाळी मुंबई वरून बारामती येथे खाजगी विमानाने जात असतांना त्यांच्या विमानाचे भिषण अपघात झाले यात अजित पवार व विमानातील पायलट सुरक्षा रक्षक सर्वांचेच दुःखद निधन झाले यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचे डोंगर कोसळले अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राचे अंत्यन्त नुकसान झाले असून ही पोकळी कधी ही भरून निघणार नाही.
आज घुग्घूस नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा दिप्ती सुजित सोनटक्के उप – नगराध्यक्ष राजुरेड्डी बांधकाम सभापती रोशन पचारे, सार्वजनिक स्वच्छता वैद्यक आणि आरोग्य समितीचे सभापती नुरूल सिद्दीकी,महिला व बाल कल्याण सभापती माला ताई मेश्राम, नगरसवेक तौफिक शेख सर्व नगरपरिषद कर्मचारी व नागरिकांनी श्रद्धांजली अर्पित करीत दोन मिनिटाचे मौन पाळून अभिवादन केले.









