आज १५ नोव्हेंबर “जनजातीय गौरव दिवस” म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. कारण आज महान क्रांतीकारक,स्वातंत्र्यसैनिक आणि लोकनायक धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती आहे.आजचा दिवशी १५ नोव्हेंबर १८७५ ला बिरसा मुंडा यांचा एका गरीब कुटुंबात जन्म झाला. लहान असतापासुन त्यांचात समाजासाठी झटण्याची वृती आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद होती त्यांचात जन्मजात नेतृत्व गुण होते त्यांनी ब्रिटिश सरकारचे अन्यायकारक कायदे,जमिनदार व महाजनांचे शोषण तसेच आदिवासीच्या जमीन काबिज करण्याचा विरोधात “उलगुलान” नावाची क्रांती उभारली.त्यांचा नेतृत्वाखाली लाखो आदिवासी एकत्र आले आणि “अबुआ दिसुम अबुआ राज” म्हणजेच “आम्हची जमीन,आमचे राज” असा नारा दिला.९ जुन १९०० ला त्यांचे कारागृहात निधन झाले. या २५ वर्षाचा अल्पायुषात संपूर्ण आदिवासी समुदायात शिक्षण, स्वाभिमान, एकता आणि स्वराज्य याचे महत्व पटवुन देउन समाजात जागृती निर्माण केली.
त्यांचे कार्य इतके प्रभावी होते की भारत सरकार ने त्याना ” स्वातंत्र्य संग्रामातील विर योद्धा ” अशी गौरवशाली मान्यता दिली. धरती आबा बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समुदायाचे नव्हे तर संपुर्ण भारताचे प्रेरणास्त्रोत्र आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा असेल , स्वाभिमान जपायचा असेल आणि समाजाचा उन्नतीसाठी काम करायचे असेल तर त्यांचा जिवनातुन आज आपण प्रेरणा घेउन काम करु तर नक्कीच आपण त्यांची खरी जयंती साजरी केलोय असे समजतो… – ✍🏻 सचिन पिपरे







