Home गडचिरोली शताब्दी महोत्सव साजरा करणारी जिल्हा परिषद केंद्र शाळेचे अस्तित्व संपणार..?

शताब्दी महोत्सव साजरा करणारी जिल्हा परिषद केंद्र शाळेचे अस्तित्व संपणार..?

0
177

शताब्दी महोत्सव साजरा करणारी जिल्हा परिषद केंद्र शाळेचे अस्तित्व संपणार..?

 

चामोर्शी, सुखसागर झाडे
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 दिनांक 01.04.2010 पासून लागू झाला आहे. उक्त अधिनियमातील तरतुदींच्या आधारे शासन निर्णय दिनांक 13.02.2013 अन्वये शाळांची प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशी संरचना/स्तर निश्चित करण्यात आले असल्याचे निमित्त समोर करून येथील शताब्दी महोत्सव साजरा झालेली जिल्ह्यात नावलौकिक मिळवून दिलेली जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक केंद्र शाळा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला जोडण्याचे आदेश देण्यात आल्याने येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचे अस्तित्वच संपणार आहे.

येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा स्वातंत्रपूर्ण काळात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसतांना सुध्दा शिक्षणापासून कोनीही वंचित राहु नये यासाठी चांदा जिल्ह्यातील चामोर्शी याच खेडे गावात इंग्रजाच्या शासन काळात अंदाजे १८८५ मध्ये मराठी प्राथमिक शाळेची स्थापना झाली त्यावेळी इयत्ता ०१ ते ०४ पर्यंतची शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात आली. स्वातंत्रपूर्व काळात स्थापन झालेल्या या मराठी शाळा
२०१७ पर्यंत तालुक्यातील केंद्र शाळा म्हणून नावारूपास आली. त्या शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक सुविधेकडे लक्ष देत असल्याने सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून माहिती तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकून शाळेला यशाचे शिखर गाठता आले. म्हणून त्या शाळेला १३२ वर्ष पूर्ण झाले त्यावेळी शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला होता. २०२५ मध्ये त्या शाळेला १४० वर्ष पूर्ण होत आहेत. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत २४० तर इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंत १२३ एकूण ३६३ विद्यार्थी आजही शिक्षण घेत आहेत. तर एक मुख्याध्यापक, दोन पदवीधर, एक ते पाचवी साठी १० असे एकूण १३ पदे मंजूर असून या वर्षी ११ शिक्षक कार्यरत आहेत.

शासन निर्णय दिनांक 02.07.2013 अन्वये प्राथमिक शाळांच्या सुधारित संरचनेनुसार माध्यमनिहाय इयत्ता 4 थी पर्यंतच्या शाळेस इयत्ता 5 वीचा वर्गजोड करणे, इयत्ता 7 वी पर्यंतच्या शाळेस इयत्ता 8 वी चा वर्ग जोडण्याबाबत सुधारित निकष विहित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार इयत्ता 1 ली ते 5 वी, इ. 6 वी ते 8 वी, इ.9 वी ते 10 वी अशी संरचना करण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करून महाराष्ट्र स्वंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 राज्यात लागू करण्यात आला असून त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे ही आदेशात स्पष्ट केले आहे. या अधिनियमांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये दर्जावाढ अथवा वर्ग जोडण्यास मान्यता देण्यात येत असल्याने व सदर शाळांकडे मर्यादित आर्थिक स्रोत उपलब्ध असल्याने, नवीन शाळा, दर्जावाढ अथवा वर्ग जोडण्यासाठी आवश्यक अतिरिक्त शिक्षक व भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्ट्रीने राज्यात प्रामुख्याने इयत्ता 1 ली ते 8 वी/इ.1 ली ते 10/इ. 1 ली ते 12 वीच्या संयुक्त शाळा असाव्यात, अशी शिफारस केली असून या बाबीचा विचार करता गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद हायस्कुल व जि.प. प्राथमिक शाळा एकाच परिसरात आहेत. सदर शाळा एकत्रित केल्याने तज्ञ शिक्षक व भौतिक सुविधा पुरविणे शक्य होणार आहे त्यामुळे या शाळेचे एकत्रिकरण करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद च्या २६ सप्टेंबरच्या आदेशात नमूद केले असून याअगोदर प्रशासन या शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करु शकली नाही तरी मात्र गेल्या १४० वर्षापासून या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन चांगल्या पदावर गेले. आजही शिक्षण घेत असताना २०१३ च्या आदेशाचा आधार घेत काही वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या त्या परिसरातील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाला जोडण्याचा घाट घातला गेला आहे. त्यामुळे १४० वर्ष झालेल्या शाळेचे अस्तित्व संपणार आहे हे मात्र निश्चित?

जिल्हा परिषद हायस्कुलला केंद्र शाळा जोडण्यास विरोध
शताब्दी महोत्सवी असलेल्या केंद्र शाळेमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, वाचनालय, डिजिटल पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी अद्यावत ई-सामग्री, सुसज्ज इमारत, जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली ही शाळा जिल्हा परिषद हायस्कूलला जोडण्याचा घाट घातला आहे त्याला आमचा विरोध आहे. – भूषण पोरटे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रशाळा चामोर्शी

येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा शताब्दी वर्ष साजरा केलेली असून या शाळेत आमची मुले चांगले शिक्षण घेत असतांना ती शाळा जिल्हा परिषद हायस्कुलला जोडण्याचा जिल्हा परिषद प्रशासनाने नुकताच आदेश काढला आहे, तो आदेश मागे घ्यावा! – भास्कर चौधरी, पालक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!