कोरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही या दिशेने नियोजन करा! आ. किशोर जोरगेवारांच्या वरिष्ठ अधिका-यांना सुचना
चंद्रपूर🟥किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित रुग्ण मिळत आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करण्याची गरज असून कोरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही या दिशेने उत्तम नियोजन करावे अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या आहे.मागील वर्षी कोविडसाठी आरक्षित करण्यात आलेल्या रुग्णालयासह आणखी काही खाजगी रुग्णालये कोविड करिता आरक्षित करण्यात यावे, रेमडीसीविर या इंजेक्शनचा काळा बाजार होत आहे. त्यावर रोख लावण्याकरिता उपाययोजना कराव्यात, कोविड करिता आरक्षित करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयात बेड रिक्त असून सुद्धा गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्या जात नसल्याचे प्रकार समोर आले आहे. अश्या रुग्णालयातील व्यवस्थापनावर कडक कार्यवाही करण्यात यवी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून दररोजची माहिती घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी, रुग्णालयात भरती असलेल्या कोविड रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नसेल तर कारखान्यांना देण्यात येणारे ऑक्सिजन बंद करून पहिले रुग्णांना ऑक्सिजन देण्यात यावे, केवळ 20 कोरोना रुग्णांना गृह विलगिकरन करण्याकरिता डॉक्टरांना परवानगी आहे. मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यात वाढ करण्यात यावी आदी सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहे.