संविधानच भारतीय जीवनाचा मूलाधार – डॉ उमेश तुळसकर
अनंत वायसे
हिंगणघाट :- मातोश्री आशाताई कुणावार, कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे दिनांक २६/११/२०२० ला राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ उमेश तुळसकर, प्राचार्य मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाट तर अतिथी म्हणून प्राचार्य नितेश रोडे, विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजन करून करण्यात आली.
प्रसंगी प्रा अजय बिरे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन सर्वांकडून करून घेतले.अतिथी नितेश रोडे यांनी संविधानातील तरतुदी प्रत्येक नागरिकांनी व्यवस्थित अभासून स्वतःच्या विकासात उपयोग करून घेणे गरजेचे आहे असे मत मांडले तर अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर यांनी संविधान खऱ्या अर्थाने भारतीय जीवनाचा मूलाधार आहे प्रत्येकाने संविधानाचे महत्त्व लक्षात घेऊन संविधनिक तरतुदी समजून घेतल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा अभय दांडेकर, सहकार्यक्रम अधिकारी प्रा सपना जयस्वाल व कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन प्रा वैशाली तडस तर आभार प्रा मोनिका मावुस्कर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापकानी सहकार्य केले