पुढल्या वर्षी पासुन अम्मा कि पढाई उपक्रम राबवत 100 विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण देणार – आ. किशोर जोरगेवार

0
210

पुढल्या वर्षी पासुन अम्मा कि पढाई उपक्रम राबवत 100 विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण देणार – आ. किशोर जोरगेवार

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गुणवंत कौतुक सोहळ्याचे आयोजन

 

परिस्थितीमुळे शिक्षण सुटण्याच्या दु:खाची मला जाणीव आहे. चंद्रपूरात अभ्यासु विद्यार्थी आहे. शिक्षणाची आवड येथील विद्यार्थ्यांना आहे. मात्र गरिब परिस्थिमुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे आपण पूढच्या वर्षी पासून अम्मा कि पढाई हा उपक्रम सुरु करणार आहोत. या उपक्रमा अंतर्गत परिस्थितीमुळे पुढील शिक्षणात अडचणी येत असणा-या टॉपर 100 विद्यार्थ्यांना आपण नि:शुल्क शिक्षण देणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

रविवारी प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण आघाडीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापिठाचे माजी कुलगुरु किर्तिवर्धन दिक्षीत, वाहतूक निरीक्षक शिवाजी विभूते, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, आदिवासी विभाग जिल्हा प्रमुख जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभाग युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक विश्वजीत शहा, सायली येरणे, शाहीन शेख, विमल कातकर, तालुका उपाध्यक्ष दयानंद नगरकर, प्रा. श्याम हेडाऊ, आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रात भरीव काम करण्याचा संकल्प आपण केला आहे. गरिबाचा मुलगा शिकला पाहिजे. तो मोठा अधिकारी झाला पाहिजे. मात्र आजची शिक्षण व्यवस्था सर्वसामान्यांना परवडणारी नाही. याची कल्पना आम्हाला आहे. त्यामुळे गरिब गरजु विद्यार्थ्यांसाठी आपण मतदार संघात 11 मोठ्या अभ्यासिका तयार करत आहोत. येथे त्यांना सर्व सोयी सुविधा पूरविल्या जातील. त्यांना येथे नि:शुल्क अभ्यास करता येणार असे ते यावेळी म्हणाले. यातील आठ अभ्यासिकांचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच या लोकार्पित होतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

तुमचे यश केवळ तुमच्या कष्टाचे फळ नाही तर तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि तुमच्या पालकांच्या सततच्या प्रोत्साहनाचा परिणाम आहे. तुम्ही कठोर परिश्रम केलेत, आपल्या ध्येयावर अढळ राहिलात आणि प्रत्येक आव्हानाला तोंड दिले. त्यामुळेच तुम्हाला आज इथे उभे राहून सन्मानित करण्यात येत आहे. शिक्षकांच्या आपल्या अमूल्य मार्गदर्शनाशिवाय हे शक्य झाले नसते. विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणे, त्यांना ज्ञानाची गोडी लावणे आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, या सर्व बाबतीत शिक्षकांनी आपले कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडले आहे. पालकही या यशाचे खरे हकदार आहेत. तुमच्या सततच्या पाठिंब्याने आणि प्रोत्साहनानेच विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले आहे. त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही त्यांना सावरण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी सदैव तत्पर राहिलात. आजचा हा सन्मान विद्यार्थांसाठी एक नवीन सुरुवात आहे. तुम्ही इथेच थांबू नका, तर आपल्या ध्येयांचा पाठलाग करत राहा. सतत नवीन ज्ञान मिळवा, नवीन गोष्टी शिका आणि समाजासाठी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा. आजच्या या सोहळ्यातून नवीन उमेद, नवीन उर्जा आणि नवीन प्रेरणा घेऊन जा आपल्या मेहनतीने, कर्तृत्वाने आणि समर्पणाने नवीन उंची गाठा असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

या कार्यक्रमात जवळपाच 700 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, सतनाम सिंह मिरधा, चंद्रशेखर देशमूख, जय मिश्रा, आशा देशमूख, कल्पना शिंदे, कार्तिक बोरेवार, रुपेश पांडे, कैलास धायगुडे, पुण्यवर्धन मेश्राम, वंदना हजारे, माला पेंदाम, माधुरी निवलकर, अस्मिता डोनारकर, कविता निखारे, शमा काजी, चंदा इटनकर, मंजुषा दरवरे, वंदना हजारे, राम जंगम आदींनी परिश्रम घेतले. प्रा. श्याम हेडाऊ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सरोज चांदेकर यांनी सुत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here