लोकहितासाठी झटणारा नेता गमावला : आमदार सुधाकर अडबाले
चंद्रपूर : खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय जिवनाची सुरवात केली. संपूर्ण राजकीय जिवनात त्यांनी केवळ लोकहिताला प्राधान्य दिले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी ते नेहमीच आक्रमक राहिले. लोकहितासाठी झटणाऱ्या नेत्याच्या निधनाने संपूर्ण लोकसभा मतदार संघच नव्हे तर राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. एका शिक्षकाचा मुलगा ते खासदार हा थक्क करणारा त्यांचा प्रवास. घरी कुठलाही राजकीय वारसा नसताना कमी वयात त्यांनी राजकारणात आपले वेगळे वलय निर्माण केले होते. अश्या उमद्या नेतृत्वाच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. धानोरकर कुटुंबियांच्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत. बाळूभाऊ धानोरकर यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना.!