जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी खुर्द मध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा धूम धडाक्यात
कोरपना : मागील दोन वर्षे कोरोणा विषाणू महामारीमुळे सर्व शाळा,कॉलेज सहीत शिक्षण ऑनलाईनच होते.सर्व प्रकारच्या कार्यक्रमावर बंदी होती.त्यामुळे कोणतेही धार्मीक कार्यक्रम उत्साहात साजरे झाले नव्हते.शाळा ,कॉलेजमधील कार्यक्रमावरही बंदी होती. आता मात्र कोरोणाचा संसर्ग कमी झाल्यामुळे बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व उत्सव, सण,समारंभ पूर्ववत सुरू झाल्याने कोडशी खुर्द येथिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे श्रीकृष्ण जन्म उत्सव मोठ्या हर्ष -उत्साहाने साजरा करण्यात आला.
लहान मोठ्या बालकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.अनेक बालके कृष्ण,राधा यांच्या वेशभूषा करून आल्यामुळे कोडशी नगरीत जणु गोकुळच अवतरल्याचे भास होत होते. या वेळेस शाळेचे मुख्याध्यापक ज्योत्सना येनुरकर मॅडम, लोमेश्वर येलमुले सर, सुरेश शास्त्रकार सर,भास्कर मेश्राम सर,अजय विधाते सर, अंगणवाडीतील तुमाणे मॅडम,मंने ताई मदतनीस यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य,विद्यार्थ्यांनि सहभाग घेतला. यासोबतच विठ्ठल पिदुरकर,अनुज गेडाम, समिर बेग, रोशन मेश्राम,रोहित मेश्राम, मंगेश पिदुरकर,विनोद पेटकर यांसह गावातील तरुण व पालकवर्ग उपस्थित होते.