गडचांदूर-नांदा फाटा
रस्त्याची दुरवस्थ रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली असून किरकोळ अपघात व वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण त्यामुळे वाढले आहे. या रस्त्याची डागडुजी करून डांबरीकरण करण्याची मागणी प्रहार सेवक प्रमोद खिरटकर यांनी केली आहे.
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
कोरपना तालुक्यातील अधोगिक क्षेत्र म्हणून
गडचांदूर-नांदा फाटा या गावांना मोठी ख्याती असूनही गडचांदूर-नांदा फाटा रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली असून किरकोळ अपघात व वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण त्यामुळे वाढले आहे. या रस्त्याची डागडुजी करून डांबरीकरण करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे नांदा फाटा प्रहार सेवक प्रमोद खिरटकर यांनी केली आहे.
गडचांदूर, नांदा फाटा,हिरापूर, अंतरगाव या मार्गावर अल्ट्राटेक सिमेंट व मुरली सिमेंट कम्पनी असल्याने जळ वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून थानीक पोलीस प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे, मागीला एक-दीड वर्षांपासून या रस्त्याच्या डागडुजीकडे कुणी लक्ष न दिल्याने रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. प्रवासाला वेळ लागत असल्याने या रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. खड्ड्यांमुळे प्रवासाचा वेळ वाढला आहे. खड्ड्यांतून खडी रस्त्यावर इतरत्र पसरल्याने वाहने पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. साईडपट्ट्या खचल्याने समोरून वाहने आल्यास अवजड वाहने रस्त्याच्या कडेला घेतांना वाहनचालकांची तारांबळ उडते. या रस्त्यावरून जाताना रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडतो. लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाहनचालक व प्रवाशांचे मात्र हाल होतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष घालण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे नांदा फाटा सेवक प्रमोद खिरटकर यांनी केली आहे.