बाबूराव बोरोळे/उदगीर तालुका प्रतिनिधी
लातूर/ता.शिरूर अनंतपाळ:- शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळमोड येथे तालुका कृषी अधिकारी एस.एल.नाबदे यांनी येरोळमोड येथील कृषी दुकानाची पाहाणी मंगळवार रोजी करून दुकांनचालकांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या असून सोयाबीन पिकाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा कुर्षीअधीक्षक अधिकारी गवसाने यांनी सांगितलेल्या पेरणीविषयक अष्टसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन केले. कृषी सेवा केंद्र चालकांनी गोणपाटावर १०० सोयाबीन बियाणाचे दाणे टाकून उगवण क्षमता कशी तपासावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवावे.
त्यानंतर बी.बी.एफ. पद्धतीने पेरणी करण्याचे फायदे उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगावे. सोयाबीन ३ ते ५ सें.मी. खोलीवर अशा पद्धतीने पेरणी करण्यासाठी सांगावे. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले. सध्या पेरणी कांही दिवसावर येवुन पोहचली आहे. शेतकरी बियांने, खते, घेण्यासाठी कुर्षी दुकानदार लगबग चालु आहे. शेतक -यांनी बियाणे घेतेवेळी लेबल, बियांने चांगल्या प्रतीचे बघून खरेदी करावी. बँग खालील बाजूस फाडुन बियांने काढावे व वरील सिल भाग सांभाळून ठेवावेत आशा सुचना तालुका कृषी अधिकारी नाबदे यांनी केलीआहे. तर कृषी दुकानदारानी स्टॉक रजिस्टर दररोज लिहावे, लायसन्स व भाव फलक समोरी बाजुस लावावे. आशा सुचना तालुका कृषी अधिकारी एस.एल.नाबदे यांनी कृषी दुकानदारनां सुचना केल्या आहेत.
कुर्षी दुकानदाराने दिलेल्या सुचनांचे पालन नाही केल्यास व दुकानावर दररोजच्या दररोज भावफलक दुकानासमोर लावावे. व शेतकऱ्यांच्या दुकानदाविषयी तक्रारी आल्यास दुकानदाराचे परवाना लाँयसनस रद्द करण्यात येईल. अशा सूचना दुकानदाराना दिल्या आहेत.
एस.एल.नाबदे”तालुका कुर्षी अधिकारी शिरूर अनंतपाळ..