मॅजिक बस इंडीया फौंडेशन च्या वतीने बल्लारपूर तालुक्यातील 17 गावात जागतिक पर्यावरण दिवस साजरा

0
720

मॅजिक बस इंडीया फौंडेशन च्या वतीने बल्लारपूर तालुक्यातील 17 गावात जागतिक पर्यावरण दिवस साजरा

आज दिनांक ५ जून २०२१ जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने बल्लारपूर तालुक्यातील 17 गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे | पक्षीही सुस्वरे आळवीती।

कोविड सारख्या परिस्थितीत देखील सुरक्षित कोविड चे नियम पाळून ‘एक मूल एक झाड’ हा नवीन उपक्रम मॅजिक बस च्या वतीने राबविण्यात आला त्याच सोबत गावातील सामाजिक संस्था सेवा सहकारी संस्था या संस्थेने देखील गावात झाड लावून जनजागृती चे काम मॅजिक बस सोबत केले. त्याच सोबत कोविड च्या या बिकट परिस्थितीत ऑक्सिजन ची किंमत आपल्याला समजायला लागली त्याच अनुषंगाने झाडांचे अधिक महत्व पटवून जनजागृती चे काम मॅजिक बसनी आज या पर्यवरणन दिवसा निमित्त केले आहे. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर च्या स्केल प्रकल्पा अंतर्गत १२ ते १६ या वयोगटातील मुलांना जीवन कौशल्य शिकविल्या जात आहे. त्याच सोबत ऑनलाइन शिक्षण पद्धतीने मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात मुलाना ठेवून त्याचा सर्वांगिक विकासासाठी प्रयत्न करत आहे.
पर्यावरण दिवसा निमित्य गावातील लोकं विद्यार्थी युवक मंडळी गावातील प्रतिष्ठित नागरिक आशा वर्कर अंगणवाडी सेविका,सरपंच,पदाधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवला सोबतच गावातील प्रत्येक गावातील समुदाय संघटक यांनी प्रत्येक गावात हा उपक्रम राबविला.
या कार्यक्रमाची रूपरेषा व मार्गदर्शक मॅजिक बस चे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गदर्शना खाली जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here