इंदाराम येथे समाज मंदिर ( गोटुल ) चे भूमिपूजन संपन्न
समाज मंदिराचे भुमिपुजन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार
गडचिरोली, सुखसागर झाडे :अहेरी तालुक्यातील इंदाराम येथे समाज मंदिर बांधकामाचे भुमिपुजन सोहळा पार पाडण्यात आला. आदिवासी समाजाच्या सांस्कृतीक तथा पंरम्परागत रूढी, प्रथा,परंपरा,चालीरीती यांचे जोपसना करण्यासाठी व आदिवासीचे कार्यक्रम घेण्यासाठी समाजाच्या समाजभवन नसल्याने विविध उत्सव साजरे करण्यात अडचण निर्माण होत होती.
इंदाराम येते आदिवासी उत्सव समितीच्या जागा उपलब्ध असल्याने सदर जागेवर सांस्कृतीक समाजभवन उभारून दिल्यास समाजाचे कार्यक्रम घेण्यास सोईचे होईल व आम्हाच्या समाजाच्या सांस्कृतीक विकासालाही चालना मिळेल.
या उद्देशाने आदिवासी उत्सव समितीने जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना इंदाराम येतील प्रतिष्टित नागरिकांनी निवेदन देवून समाज भवनाची मागणी केले होते. निवेदन स्वीकारताना शब्द दिले आहे कि,आपण नेहमीच सर्व समाजाला मदत करत आले असून इंदाराम येते आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने समाज भवन आवश्यक असून मि शब्द देतो कि येत्या काही दिवसांतच समाज भवनासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते.
जिल्हा परिषदेच्या 13 वने निधी अंतर्गत 15 लाख रुपए मंजूर केले असुन काल सदर समाज भवनाच्या भूमिपूजन जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी श्री. अजय नैताम जि. प.सदस्य,सौ.वर्षा पेंदाम सरपंच इंदाराम,श्री.वैभव कंकडालवार उपसरपंच इंदाराम, श्री.गुलाबराव सोयाम माजी सरपंच इंदाराम, श्री.मूसली तलांडे, भरी.बुदाजी सोयम, बापू सिडाम, अर्जुन सोयाम,दिलीप मडावी,रमेश आत्राम, चंद्रशेखर कोरेत,साई कोरेत,रगु कनाके, नामदेव तलांडे, मदुकर मडावी,उमेश कोरेत,सुगंदा मडावी, सोनी सोयम, सावित्री वेलादी, निर्मला कोरेत,अनिल तलांडे, तेजराव दुर्गे, संतोष कोडापे, प्रशांत गोडशेलवार, राकेश सडमेक तसेच गावातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.