बीबी येथील अस्थाई विद्युत कर्मचारी मृत्यू प्रकरण वेगळ्या वळणावर
पोलिस प्रशासनाच्या कारवाईकडे संपूर्ण आदिवासी जमातीचे लक्ष?
कोरपना तालुक्यातील बिबी ग्रामपंचायत तिच्या अधिनस्त असलेला अस्थायी विद्युत कर्मचारी मारुती घोडाम हा पूर्वीचे नांदा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच उत्तम काळे यांच्या बीबी येथील निवास स्थानावरून विद्युत महामंडळाच्या गेलेल्या तारावती विद्युत रोधक आवरण घालण्याकरीता जवळच असलेल्या खांबावरती चढला असताना तारेचा स्पर्श होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली ग्रामपंचायतीचा अस्थायी कर्मचारी असल्यामुळे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर मृतक हा कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायतीची पूर्वपरवानगी न घेता काळे यांच्या घरावरून गेलेल्या विद्युत तारेला आवरण घालण्याकरीता खांबावती चढला असता त्यातच त्याचा मृत्यू झाला. पुढे स्थानिक प्रशासनाच्या वतीने मदत व्हावी या हेतूने वाटाघाटी सुरू झाल्या. वाटाघाटी होत नसल्याचे दिसून येताच शेवटी पोलीस प्रशासनाला आमंत्रित करण्यात आले.
उच्च स्तरीय तपासणी करीता प्रेत गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र ग्रामपंचायतीचा आदेश नसताना कोणाच्या परवानगीने सदर मृतक खांबावरती चढला हा एक प्रश्न कायम आहे.
पोलिस प्रशासनाने वाटाघाटी होत नसल्याने प्रेत तपासणी करीता पाठविले मात्र कोणता तोडगा निघाला नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणावर पोलिस प्रशासनाच्या कारवाईकडे संपूर्ण आदिवासी जमातीचे लक्ष वेधले आहे.
बीबी गावात विजेच्या तारेचा स्पर्श होऊन मृत पावलेल्या मारुती घोडामला योग्य तो न्याय देण्यात यावा. कामासाठी परावृत्त केलेल्या व्यक्तीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बीबी येथील आदिवासी जमाती चे कार्यकर्ते भारत आत्राम यांनी केली आहे.