शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना थकीत पगार,भविष्य निधी व ग्राजुटी बद्दल तक्रारी केल्या म्हणून नौकरी वरून बडतर्फ करू नये
विद्यार्थ्यांवर शुल्क शक्ती नको
ऐ.आय.सी.टी.ई. चा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांना सूचना वजा महाविद्यालयावर कार्यवाही करण्याचे आदेश
कोठारी, राज जुनघरे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषेदेच्या(ऐ.आय.सी. टी. ई.) अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शुल्कशक्ती करू नये व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना नौकरीवरून निलंबित करू नये अश्या स्पष्ट सूचना ऐ.आय.सी. टी. ई. कडुन देण्यात आल्या आहे व विद्यार्थ्यांकडून तीन किंवा चार सत्रामध्ये शुल्क आकारणी करावी एकाच सत्रात पूर्ण शुल्क भरण्याचा आग्रह धरू नये असे ऐ.आय.सी. टी. ई. कडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. महाविद्यालयात शिकवत असलेल्या प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही नौकरीवरून अथवा बडतर्फ करू नये असेही ऐ.आय.सी. टी. ई. कडून सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून महाविद्यालयये बंद आहेत गेल्या वर्षी अनेक महाविद्यालयाने ऑनलाईन शिक्षणाद्वारे शैक्षणिक वर्ष पूर्ण केले आहे. यंदा विद्यार्थ्यांना अश्याच प्रकारे शिक्षण घ्यावे लागू शकते यामुळे महाविद्यालयांनी पहिल्याच सत्रामध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरावे असा आग्रह धरू नये तीन किंवा चार सत्रामध्ये टप्याटप्याने विदयार्थ्यांकडून शुल्क घ्यावे विद्यार्थी आणि त्याच्या पालकांची आर्थिक परिस्तिथी पाहता टप्याटप्याने शुल्क भरणे शक्य होइल यामुळे यामुळे वादंग निर्माण होणार नाहीत असे संस्थेतर्फे सांगण्यात आले असून सर्व महाविद्यालयांनी या सूचनांचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे.
कोरोना पादुर्भावाचा काळ जरी असला तरी प्राध्यापकांना व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना कामावरून कमी करण्याचा किंवा मानसिक त्रास व शारीरिक त्रास देऊन पगार थकवण्याचा अधिकार महाविद्यालयांना नाही असे प्रकार निदर्शनास आल्यास महाविद्यालयाच्या संस्था अध्यक्ष व प्राचार्य यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा ऐ.आय.सी. टी. ई. कडून नुकताच देण्यात आला आहे. या सर्व प्रत्येक महाविद्यालयाने त्याच्या वेबसाईट व ऑनलाईन व्यासपिठावर जाहीर कराव्यात व महाविद्यालयाच्या फलकावरही प्रसिद्ध करण्यात यावे असे ऐ.आय.सी. टी. ई. ने स्पष्ट सांगितले असताना सुद्धा बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि च्या संस्थाध्यक्ष ऍड. बाबा वासाडे यांनी थकीत वेतन व कर्मचारी भविष्य निधी,ग्राजुटी व अन्य बाबीसाठी रीतसर व कायदेशीर मार्गाने अनेक माघील वर्षा पासून लढा देणारे श्री. देवेंद्र सायसे,लिपिक हे कर्मचारी देत आहे त्यांच्यास तक्रारीवर गोंडवाना विध्यापिठाने बी. आय. टी. कॉलेज च्या अध्यक्ष व प्राचार्य याना अंतिम ताकीद दिले तसेच कर्मचारी भविष्य निधी संघटन नागपूर यांनी भविष्य निधी थकबाकी 1 करोड 88 लाख काढले म्हणून लढवय्ये कर्मचारी श्री. देवेंद्र सायसे याना बेकायदेशीर निलंबित करण्यात आले आहे तसेच श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय भद्रावती येथील कर्मचारी प्रा. आशिष मिलमीले,शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.गणेश बाजाईत,श्री. अजयकुमार मेश्राम यांनी सर्व कर्मचार्यांना सोबत घेऊन महाविद्यालयाच्या गेट समोर एक महिन्यापासून यांचे असहकार आंदोलन चालू ठेवले म्हणून त्यांना पण संस्था सचिव श्री.अमित येरगुडे यांनी निलंबित केले आहे ह्या सर्व दोन्ही महाविद्यालयातील कर्मचार्यांनी कुठल्याही परिणामास न जुमानता युनिव्हर्सिटी कॉलेज ट्रीबुनल,नागपूर न्यायालयात कर्मचार्यानि धाव घेतली व संस्थेच्या अध्यक्ष व प्राचार्य यांच्या विरोधात याचिका दाखल केली व न्यायालयाने संस्था अध्यक्ष व प्राचार्य याना नोटीस बजावून न्यायालयात हजर राहण्याचे आवाहन केले आहे याचिकातर्फे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ऍड. योगेशकुमार गोरले यांची नियुक्ती केली आहे.