थैमान महाभयानक कोरोनाचे !
वराेरा (चंद्रपूर), किरण घाटे : चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा निवासी तथा चारगांवच्या सहाय्यक शिक्षिका वंदना अजय आगलावे यांनी सध्या जगभर चर्चेचा विषय असलेल्या महाभयानक काेराेनावर संक्षिप्त लेख शब्दांकित केला आहे .ताे खास वाचकांसाठी आम्ही येथे देत आहाे .
वेड लागलं हो या कोरोनाला
चीन मधून लपून छपून आला
भारतात ठाण मांडून बसला
चालती बोलती माणसं मारायला लागला.
मागील वर्षीपासून कोरोना या महाभयंकर महामारी ने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. जगाला या महामारी तून सावरता सावरता पुरेवाट झाली आहे. पण कोरोना काही दम घेऊ येत नाही. पहिल्या लाटेतून जग कुठे आता तर सावरायला लागलं होतं, तर दुसरी लाट येऊन उभी झाली. या दुसऱ्या लाटेने तर भारताला चांगलं झोडपूनच काढल, त्यात आपला अति उष्ण तापमानाचा चंद्रपूर जिल्हा सुद्धा सुटला नाही. आरोग्य विभागाची दाणादाण उडवली. सर्व यंत्रणा या कोरोना पुढे हतबल ठरत आहे. आरोग्य विभाग डॉक्टर, नर्सेस, शिक्षक, पोलीस, आणि सरपंच उपसरपंच,अधिकारी वर्ग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. आत्ता कुठे जेमतेम दुसरी लाट कमी व्हायच्या आतच तिसरी लाट येण्याच्या मार्गावर आहे असे समजते. घाबरू नका बांधवांनो या कोरोणा विरुद्ध नेटाने लढा द्या.
येऊ देत लाख संकटे
आम्ही आता डरणार नाही
पायदळी तुडवू या कोरोणाला
आता मागे हटणार नाही.
काेणीही या कोरोणला आता घाबरून जमणार नाही. जीवन जगत असताना संकटे येणारच. या संकटाशी दोन हात करायला शिका. सध्या आपल्यावर कोरोना रुपी महा मारीचे भयंकर संकट आहे, कोरोनाला हरविण्यासाठी खालील नियम आचरणात आणा.
१) विनाकारण घराबाहेर पडू नका
२) गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
३) हात वारंवार साबणाने धुवा
४) बाहेरून आणलेल्या भाज्या फळे धुतल्यानंतरच वापरा.
५) मास्क बांधा
६) हस्तांदोलन करू नका दुरूनच नमस्कार करा.
७) सामाजिक अंतर पाळा
८) लसीकरण करून घ्या. इतरांना लसीकरण ना करिता प्रेरित करा.
९) कुठेही थुंकू नका
१०) योग, प्राणायाम नियमितपणे करा.
११) सकस आहार घ्या. आठ तास झोप घ्या.
१२) अफवांवर विश्वास ठेवू नका
१३) सकारात्मक विचार करा
१४) कोरोना सदृश्य कोणतेही लक्षण आढळल्यास दवाखान्यात जा. Rt-pcr टेस्ट करून घ्या.
१५) कोरोना पॉझिटिव्ह आले तरी, घाबरू नका हिमतीने व योग्य उपचार करून कोरोना वर मात करा.
१६) प्लाजमा दान करा.
१७) झाडे लावा ,प्राणवायू वाढवा.
१८) घरी येणाऱ्या सर्वेक्षण पथकांना सहकार्य करा.
१९) स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या.
२०) शासनाला सहकार्य करा.
२१) स्वच्छता पाळा.
वरील सर्व गोष्टी या सहज सोप्या आहेत. वरील गोष्टींचे पालन करून आपण नक्कीच कोरोना ला पळवून लावू शकू.
जे गेलं त्याचा विचार न करता, परत नव्या उमेदीने उठा. घरीच रहा !सुरक्षित रहा! येणारे दिवस आपलेच आहेत! येणारे दिवस आपलेच आहेत!
🟪🔸साै. वंदना अजय आगलावे (बोढे)
सहाय्यक शिक्षिका चारगाव
पंचायत समिती भद्रावती जि.चंद्रपूर