इथे ओसळतो माणुसकीचा झरा
आयुष्यभर स्वतःसाठी जगण्यापेक्षा एक दिवस समाजाच्या उद्धारासाठी जगा
युवा काॅंग्रेस अध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे यांचे प्रतिपादन
सुखसागर झाडे:- अनेकांच्या मनात समाजाचे ऋण फेडावे, अशी मनिश्चा असते. ती संधी अनेकदा डोळ्यासमोर येते. मात्र, प्रत्यक्ष कृती करता येत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. अनेकांना कामाच्या ओघात वेळ मिळत नाही. सेवा करावी तर दुसऱ्यांवर अन्याय होतो, हे वास्तव आहे. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती असली तर काहीही साध्य करता येऊ शकते, हे सर्वसामान्य माणसाला आशीर्वाद देणाऱ्या गिरीशभाऊ कुकडपवार कुटुंबातील सदस्यांनी युवक काँग्रेसने सुरू केलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील भोजनदान कार्यक्रमाच्या उपस्थितीतून अनेकांनी अनुभवली. जिल्हा युवक काँग्रेसने मागील १६ दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भोजनाची व्यवस्था केली जात आहे. या कार्यक्रमाला गिरीश कुकडपवार स्वतः कुटूंबीयासह उपस्थिती दर्शवून रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरीत केले. आपल्या कामाच्या वेळेतील काही वेळ जणसेवेसाठी त्यांनी दिला. त्यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. गिरिशभाऊंनी दिलेली सेवा आम्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले सोबतच त्यांनी दिलेली सेवा इतरांना प्रेरणा देणारी आहे, असे मत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे यांनी व्यक्त केले.