आमदार सुभाष धोटे यांनी घेतला गोंडपिपरी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा
गोंडपिपरी (सूरज माडूरवार) : दि.१० सोमवारी आमदार सुभाष धोटे गोंडपिपरी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी येथील ग्रामीण आरोग्य केंद्र, कोरोना लसीकरण सेंटर, कोरोना केअर सेंटर ला भेट दिली, येथील रूग्णांना आणि वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांना विचारपूस केली. यावेळी त्यांच्या प्रयत्नाने मिळालेले ७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले. येथे ३० आॅक्सिजन बेड ची सुविधा निर्माण करणे, विद्युत दहनयंत्र निर्मिती करणे तसेच गोंडपिपरी नगर पंचायत अंतर्गत १ कोटी १७ लाख रुपये खर्च करून आॅक्सिजन प्लांट निर्माण करणे इत्यादी कामांना प्राधान्य देऊन युद्ध स्तरावर सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी सुचना धोटे यांनी स्थानिक प्रशासन आणि अधिकारी व पदाधिकारी यांना दिल्या.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डव्हळे, तहसीलदार के. डी. मेश्राम, सभापती सुनीता येग्गेवार, डॉ विशाखा शेळकी, गट विकास अधिकारी शेषराव बुलकुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश चखोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप बांबोळे, ठाणेदार संदिप धोबे, सुरेश चौधरी, काँग्रेसचे अध्यक्ष तुकाराम झाडे, माजी नगराध्यक्ष सपना साखलवार, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, माजी प स सदस्य रामचंद्र कुरवटकर, राजु झाडे यासह परिचारिका, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.