नवेगाव येथील मेश्राम कुटुंबियांचे राजू झोडे यांनी केले सांत्वन
आठ दिवसात काम पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा राजू झोडे यांचा इशारा
गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथे पिकअप चालकाचा मध्यधुंद अवस्थेत वाहनावरील ताबा सुटल्याने वाहनाच्या खाली येऊन एक ठार तर दोन चिमुकले गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार ला रात्री घडली.
आष्टी कडून गोंडपीपरी कडे भरधाव वेगाने येत असलेल्या पिकअप चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने ही हृदय हेलावणारी घटना घडली.
सदर प्रकरण ताजे असताना पुन्हा दोन दिवसांनी रविवारी रात्री च्या सुमारास एक ट्रक रस्त्याखाली उतरला सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.गावकऱ्यांनी पुन्हा आक्रोश करीत ताबडतोब रस्त्यालगत दिशा दर्शक यंत्र व उर्वरित काम पूर्ण करण्याची मागणी रेटून धरली जो पर्यंत वरिष्ठ अधिकारी येणार नाही तो पर्यंत काम सुरू करू देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली.त्यानंतर वंचित बहुजन आघाडी चे नेते राजू झोडे यांनी मेश्राम कुटुंबियांना भेट देऊन त्यांचे सांत्वन करीत बालाजी कंपनी व सदर हायवे विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा देत आठ दिवसाच्या गावातील मुख्य मार्गावरील काम पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे ठणकावले.गावकऱ्यांनी राजू झोडे यांच्या शब्दाला मान देत आठ दिवसाचा अलटीमेटम बालाजी कंपनी व समंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ता राजू झाडे,सामाजिक कार्यकर्ते तथा रा.यु.कॉ ता अध्यक्ष सुरज माडूरवार, राजेश दोड्डीवार,सचिन पावडे,दिनेश दुपारे,गुरु कामटे,पत्रकार नितेश डोंगरे, समीर निंमगडे,नाना एलेवार,शैलेश भैस यांच्यासह गावकरी उपस्थित होते.