जिल्ह्यातील समस्त ग्रामपंचायत यांनी कोरोणा विलगीकरण कक्ष व नगर परिषद नगर पंचायत यांनी कोविड केअर सेंटर सुरू करावे – आमदार डॉ. देवराव होळी

0
677

जिल्ह्यातील समस्त ग्रामपंचायत यांनी कोरोणा विलगीकरण कक्ष व नगर परिषद नगर पंचायत यांनी कोविड केअर सेंटर सुरू करावे – आमदार डॉ. देवराव होळी

गडचिरोली शहरात कोविड केअर सेंटर सुरु करण्यास नपच्या विशेष सभेत मंजुरी

गडचिरोली नगर परिषदेने घेतला पुढाकार

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.गडचिरोली शहरातही हि संख्या मागील वर्षाच्या तुलनेत २ ते ३ पट जास्त प्रमाणात असल्याने सर्वच रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. करिता नगर प्रशासन प्रतिबंधनात्मक उपायांची अंमलबजावणी करण्या करिता दिनांक २९ एप्रिल रोजी स्थानिक नगरपरिषदेच्या सभागृहात गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची विशेष सभा घेण्यात आली.यात कोविड-१९ च्या संबंधित नगरपरिषदेने पाच महत्वाच्या विषयावर चर्चा करून ठराव घेण्यात आले.
यामध्ये शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या ईमारत मध्ये कोविड रुग्णासाठी ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यास भोतिक सुविधा व आवश्यक जागा मुबलक असुन सदर ईमारत नप क्षेत्रात मोडत असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने सोयीचे आहे.त्यामुळे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र गोकुलनगर अंतर्गत ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना विनंती पत्र दिलेला आहे.कोविड-१९ नियंत्रत करण्यास शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीमधून आवश्यक तातडीची कामे करण्यासाठी नियोजन करण्यात आले.वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत गडचिरोली नप ला रुपये १ कोटी अनुदान प्राप्त होणार असून ते कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना व कृती आराखडा तयार केला असून यामध्ये वाहन खरेदी(स्वर्गरथ) १८ लक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती ३० लक्ष,साहित्य खरेदी १७ लक्ष 89 हजार, कोविड सेंटर विद्दुतीकरण व इतर दुरुस्ती १२ लक्ष,कोविड रुग्णालयासाठी ओषधी खरेदी १० लक्ष व मनुष्यबळ १५ लक्ष ९ हजार रुपये एवढा खर्च अपेक्षित केला आहे. कोविड-१९ मधील मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने मोक्षधाम येथे अंत्यसंस्कारासाठी आवश्यक व अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यासाठी नियोजन करण्यात आले.शहरातील कठानी नदी किनारी असणाऱ्या स्मशानभुमी मधील शेड कमी पडत असल्याने तेथे अतिरिक्त शेडचे बांधकाम व रेटेनिंग वॉल चे बांधकाम करणे, मोक्षधामाचे सौन्दर्यीकरण करणे तसेच मोक्षधामला जोडणारा पोच रस्ता कच्या स्वरूपात असल्याने सदर रस्त्याचे बांधकाम करणे.महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियांन निधी अंतर्गत मोक्षधाम येथे विद्दुत दाहिणीची सुविधा उभारणे.नागरी प्राथमिक केन्द्र गोकुलनगर हे नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असुन सदर इमारत हि जुनी आणि कवेलुची असल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी आतमध्ये शिरत असल्याने ओषधी साठ्याचे खुप नुकसान होत असते त्यामुळे तेथे खालील उपाययोजना करण्यात येत आहे.इमारतीचे छत,वैद्यकीय अधिकारी यांचे करीता केबिन, रुग्ण तपासणी करणेकरिता तपासणी टेबल,ओषधी साठा खराब होवु नये म्हणून ओषधी रॅक,रुग्णाकरिता बसण्याची व्यवस्था,अतिआवश्यक असलेले ओषधी व इंजेक्शन ठेवण्याकरिता फ्रिज व रुग्णांकरिता बाहेर बसण्याकरिता शेडची व्यवस्था. अशा अनेक सोयीसुविधांचा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोविड-१९ रुग्णांची गैरसोय होवु नये याकरीता आजच्या सभेमध्ये नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, सभापती मुक्तेश्वर काटवे,सभापती प्रशांत खोब्रागडे,मुख्याधिकारी संजीव ओव्होळ, नगरसेवक प्रमोद पिपरे, लता लाटकर, वैष्णवी नैताम, नीता उंदिरवाडे, नितीन उंदिरवाडे, आनंद शृंगारपवार,रितु कोलते,अनिता विश्रोजवार,अल्का पोहनकर, रमेश चौधरी, गुलाब मडावी, गीता पोटावी,संजय मेश्राम, पूजा बोबाटे, रमेश भुरसे,सतीश विधाते सभेला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here