मित्रत्वाचे नाते जपणारा चंद्रपूरचा अजय दुर्गे जिवलग मित्राच्या मदतीसाठी आला पुढे
विशाल खाेब्रागडे रुग्णालयात आँक्सीजनवर
चंद्रपूर, किरण घाटे : जगभर पसरलेल्या महाभयानक व विषारी काेराेनाने सर्वांचीच झाेप उडवली आहे राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यातही त्याची झळ पाेहचली आहे .दिवसांगणिक काेराेना रुग्णांची संख्या झपाट्यांने वाढत आहे .अनेकांवर शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात सातत्याने उपचार सुरु असल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्यक्षात द्रूष्टीक्षेपात पडत आहे.
महाभयानक काेराेनाचा उद्रेक राेखण्यांसाठी गेल्या काही महिण्यांपासून शासन व प्रशासन दिवस रात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहे तरं डाँक्टर मंडळी व परिचारीका आपल्या प्राणाची पर्वा न करता काेराेना रुग्णांवर सतत उपचार करीत असल्याचे दिसून येते.अश्यातच काल मंचेरियल येथे एका रुग्णालयात भरती असणा-या व काेविड-१९ने ग्रासलेल्या चंद्रपूरच्या विशाल खाेब्रागडे यांनी आपल्या मित्र मैत्रिनींना एका संदेशातुन मदतीची विंनती केली.
विशालचा हा संदेश बघताच सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणा-या चंद्रपूर येथील विशालचा एक मित्र अजय दुर्गे यांनी क्षणाचाही विलंब न करता आजारग्रस्त विशालला मदत करण्यांचे आवाहन एका व्हाँटसअप संदेशातुन केले .बघता बघता काल विशालसाठी संध्याकाळ पावेताे २०हजार रुपयांची मदत उभी झाली.
एक हात मदतीचा या समाजिक भावनेतुन अनेक मदतदाते समाेर येवून आपल्या परीने मदत करु लागले असल्याचे खुद्द अजय दुर्गे यांनी या प्रतिनिधीस भ्रमणध्वनीरुन बाेलतांना शुक्रवारी संध्याकाळी सांगितले. सध्या विशाल खाेब्रागडेवर New Pluse Critical Care Hospital Mancherial( Telangana )येथे उपचार सुरु असुन ताे आँक्सिजनवर असल्याचे समजते.