पीक कर्जाचा नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान तात्काळ उपलब्ध करून द्या : आमदार डॉक्टर देवरावजी होळी

0
705

पीक कर्जाचा नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान तात्काळ उपलब्ध करून द्या : आमदार डॉक्टर देवरावजी होळी

जिल्ह्यात 60 ते 70 टक्के शेतकरी नियमित कर्जफेड करीत असल्याची माहिती

कर्जमाफी नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचे मंजूर करूनही अजून पर्यंत निधी उपलब्ध नाही

सुखसागर झाडे : गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यातील ७० टक्क्यांहून अधिक शेतकरी नियमित कर्जफेड करीत असून शासनाने कर्जमाफी करताना नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचे मंजूर केले होते परंतु २वर्ष होऊनही अजून पर्यंत शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान देण्यात आले नाही त्यामुळे त्यांचे अनुदान तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे.
महाविकास आघाडी सरकारने आल्या आल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली, सोबतच जे शेतकरी नियमित कर्जफेड करीत आहेत त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचे मंजूर केले. परंतु अजून पर्यंत अनेक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले नाही मागील दोन वर्षापासून कोरोणामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असताना शासनाने जाहीर केलेली मदत अजून पर्यंत न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे वित्तमंत्री अजित दादा पवार जिल्ह्याचे पालक मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here