जिल्हा परिषद सदस्याच्या पुढाकाराने नांदाफाटा येथील लसीकरण केंद्राला मंजुरी
बातमीचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट
आवाळपुर, नितेश शेंडे : जिल्हा परिषद प्रशासना कडून नांदा येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यास टाळाटाळ सुरु होती येथील जिल्हा परिषद सदस्य तथा कामगार नेते शिवचंद्रची काळे यांनी जिल्हा परिषदेच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झुम अॅपद्वारे घेण्यात आलेल्या सभेत नांदाफाटा येथील लोकसंख्येचा विचार करून लसीकरण केंद्र तातडीने सुरू करण्याची प्रशासनाला विनंती केली दोनदा झालेल्या सभेत मुद्दा लावून धरला परंतु प्रशासन लसीचा तुटवडा व आरोग्य केंद्र नसल्याचे कारण देत लसीकरण केंद्र देण्यास टाळाटाळ करीत होते नांदाफाटा परिसरातील वाढता कोरोनाचा संसर्ग , लसीकरणा करिता नागरिकांची होणारी भटकंती यामुळे आज जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांना चांगलेच धारेवर धरुन लसीकरण केंद्र तातडीने सुरू करावे अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिला होता अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी नांदाफाटा येथे तातडीने लसीकरण केंद्र सुरू करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे दिनांक २८ एप्रिलपासून सांस्कृतिक भवन नांदाफाटा येथे लसीकरण केंद्र सुरू होत आहे यात नांदा ग्रामपंचायतीने सहकार्य करून लसीकरण केंद्राकरिता कम्प्युटर व डाटा ऑपरेटर उपलब्ध करून दिला आहे ४५ वर्षावरील नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लसीकरणास परवानगी दिल्यामुळे लोकांना याचा फायदा होईल जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांचे वक्तव्य – उशिरा का होईना अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज अत्यंत चांगला निर्णय घेऊन नांदाफाटा येथील लसीकरण केंद्राला मान्यता देत तातडीने लसीकरण केंद्र सुरू करावे असे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत त्यांना आम्ही धन्यवाद देतो प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्याचा शासनाचा मानस आहे आपल्या परिसरात कोरोना संसर्ग वाढत आहे मास्क सॅनिटायझर वापर सातत्याने करून शारीरिक अंतर ठेवून कुठलीही घाई गर्दी न करता ४५ वर्षांवरील नागरिकांनी सांस्कृतिक भवन नांदाफाटा येथे जाऊन लसीकरण करुन घ्यावेत १ मे नंतर १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे याची आपण नोंद घ्यावी.