वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ३ एप्रिलला होणारे राष्ट्रवादीचे आंदोलन ढकलले पुढे
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
तालुक्यातील गडचांदूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट समूहाचा युनिट माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून विविध प्रकारचे आजार डोके वर काढत आहे व शहरातील विविध भागात घराच्या छतावर धुळीचे, कणांचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे अशा एक ना आणेल समस्या हा सिमेंट कंपनीच्या प्रदूषणामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने ३० मार्च २०२१ पर्यंत कंपनी द्वारे होणारी वाहतूक पूर्ण पने रोखली जाणार अशी माहिती १५ मार्चला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शरद सुरेशराव जोगी ता. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोरपना यांनी दिलेली होती.
परंतु राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि १४४ कलम अंतर्गत संचारबंदी, जमावबंदी प्रशासनाच्या नियमांचे पालन या हेतूने ३ एप्रिल २०२१ ला होणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माणिकगड सिमेंट कंपनी समोरील धरणे आंदोलन रद्द करून पुढील परिस्थितीनुसार घेण्यात येईल असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण निमजे राजुरा विधानसभा प्रमुख, प्रविण काकडे जिल्हासचिव, सुनिल अरकीलवार जिल्हाउपाध्यक्ष, रफीक निजामी, प्रविण मेश्राम ता. सचिव, करण सिंग भुराणी ता. उपाध्यक्ष, शेख मुनिर ल्हाबक्षशेख, प्रविण कोल्हे, मयुर एकरे, वैभव गोरे, आकाश वराटे.सदू भाऊ गिरी सतीश भोजेकर सुरज कनाके, इत्यादि पदाधिकारिणी करण्यात आले आहे.