भद्रावती तालुक्याचा लाचखाेर मंडळ अधिकारी प्रशांत बैस लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात जमीनीचा फेरफार रूजू करण्यांस मागितली हाेती दाेन हजार रुपयांची लाच
🟪🟥भद्रावती [चंद्रपूर]किरण घाटे🟪🟨चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा महसुल मंडळाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे बहुचर्चित लाचखाेर मंडळ अधिकारी प्रशांत बैस यांस एका शेतजमीन फेरफार प्रकरणात दीड हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले . चरुर धारापुरे येथील शेत जमिनीचा फेरफार रुजू करुन देण्याकरीता तक्रार कर्त्यास या मंडळ अधिका-याने चक्क दाेन हजार रुपयांची लाच मागितली हाेती. तडजाेडी नंतर ही रक्कम दीड हजार वर करण्यांत आली .परंतु उपरोक्त रक्कम देण्याची तक्रार कर्त्याची मुळीच इच्छा नव्हती या बाबतीत तक्रारदारांने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार नाेंदविली .या तक्रारीच्या अनुषंगाने लाचेची मागणी करणा-या मंडळ अधिका-यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज गुरुवार दि.१ एप्रिल रोजी सापळा रचुन रंगेहात पकडण्यात यश प्राप्त केले.
या प्रकरणा बाबत हाती आलेल्या माहिती नुसार असे कळते की चंद्रपूर येथील एका व्यक्तीचा चरुर(धारापुरे) या गावचा ( शेत जमिनीचा)फेरफार प्रमाणित करुन देण्याकरीता भद्रावती तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रशांत नरेंद्रप्रतापसिंह बैस यांनी तक्रारदारास २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली हाेती.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन दीड हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचखाेर बैस यांना तहसील कार्यालयातच साक्षदारा समक्ष रंगेहात पकडले .या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महसुल विभागातील वरिष्ठ अधिका-यांसह कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे .दरम्यान ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपायुक्त रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद तोतरे, चंद्रपूर उपअधीक्षक अविनाश भामरे, पो.ह. मनोहर एकोणकर, ना.पो.काॅ. संतोष येलपुलवार, अजय बागेसर, पो.काॅ. रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, समिक्षा भोंगळे, चालक पो.शि. सतीश सिडाम यांनी यशस्वीरित्या पुर्ण केली.हे बातमीपत्र लिहीपर्यंत या प्रकरणाची चाैकशी सुरु हाेती .