३० जुलै, हा माजी वित्तमंत्री लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिवस पोंभुर्णा तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला. देशावर आलेले कोरोनाचे संकट बघता या जन्मदिनाला “सेवादिन” म्हणून पार पाडणार असल्याचा निर्धार भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटिवार यांनी केला होता. आज पोंभुर्णा तालुक्यात शासकीय नियमांचे पालन करित अभिनव पद्धतीने लोकनेते आ. सुधिर भाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.
पोंभुर्णा तालुक्यात नवनियुक्त भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यातभारतीय जनता पक्षाच्या वतीने पोंभूर्णा येथील ७२२ गरजु महिलांचे जनधन खाते व विमा योजना काढुन देण्यात आले सदर कार्यक्रम गजानन गोरंटिवार यांच्या मार्गदर्शनात पार पडला.
आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभुर्णा तालुक्यातील गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आले. तसेच पोंभुर्णा तालुक्यातील 52गावात वृक्षारोपण करण्यात आले.पंचायत समिती पोंभुर्णा तर्फे गरजुंना विविध साहित्य वाटप करण्यात आले.नुकताच 10 वि 12 वि चा निकाल जाहीर झाला यात पोंभर्णा तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले त्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.तसेच शासकीय कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन गोरंटिवार, पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम,स्वेता वनकर नगराध्यक्ष नगरपंचायत पोंभुर्णा, रजिया कुरेशी उपाध्यक्ष नगरपंचायत पोंभुर्णा,माजी उपसभापती विनोद देशमुख, अजित मंगळगीरीवार नगरसेवक,मोहन चलाख नगरसेवक तथा युवा मोर्चा जिल्हा सचिव चंद्रपुर, दिलीप मॅकलवार, सुनिल कटकमवारअजय मस्के युवा मोर्चा तालुका अध्यक्ष,अमोल मोरे, गजानन मडपुरवार महेंद्र सोनुले,राजू ठाकरे, अजित जंबुलवार,राहुल वासेकर,व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.