महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्यासपीठा मुळे मला अधिक प्रेरणा मिळेल -श्रुती कांबळे 🟣चंद्रपूर🔶किरण घाटे🟢 महाराष्ट्रातील अनेक कर्तूत्वान महिलांचा समावेश असणां-या व सध्या प्रकाश झाेतात असलेल्या नामवंत सहजं सुचलंमुळे मला अधिक प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल असे मत चंद्रपूर निवासी ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा सदस्या श्रूती लक्ष्मीकांत कांबळे यांनी आज मंगळवार दि.२३मार्चला व्यक्त केले त्या एका छाेट्याखानी कार्यक्रमात आल्या असतांना या प्रतिनिधीशी बाेलत हाेत्या . सामाजिक कार्याची सदैव आवड व अमाप गाेडी असणां-या श्रुती कांबळे यांचे आज पावेताे सामाजिक क्षेत्रात माेलाचे योगदान ठरले आहे हे विशेष ! सहजं सुचलं महिला व्यासपीठा वरील प्रदन्या भगत , साधना वाघमारे , मनीषा मडावी , सायली टाेपकर, कल्याणी सराेदे, श्रध्दा हिवरे , प्रतिमा नंदेश्वर यांचे कार्य अतिशय उत्तम असल्याचा उल्लेख श्रूतीने आपल्या बाेलण्यातुन या वेळी व्यक्त केला या शिवाय सहजं सुचलं व्यासपीठाच्या संयाेजिका मेघा धाेटे , मायाताई काेसरे तथा प्रभा अगडे ह्या माझेसाठी निश्चिंतच प्रेरणादायी ठरणार असल्याच्या त्या म्हणाल्या .गत चार वर्षापासून हे व्यासपीठ नवाेदितांच्या कला गुणांना वाव देत आहे .हे येथे उल्लेखनिय आहे .